'आता मराठ्यांच्यात दम आहे की, त्यांच्यात आहे हे दाखवून देवू'; मनोज जरांगेंचा राजकीय नेत्यांना थेट इशारा

Maratha Reservation : राजकीय लोकांना पाडायचं की उभं करायचं हे ठरवण्यासाठी २९ ऑगस्टला अंतरवाली सराटीला या.
Manoj Jarange-Patil
Manoj Jarange-Patilesakal
Updated on
Summary

''आरक्षण मिळेपर्यंत तुम्ही समाजासाठी मतभेद विसरुन एकत्र यायला पाहिजे. माझी त्यासाठीच झुंज सुरु आहे. ती झुंज वाया जावू देवू नका.''

कऱ्हाड : राजकीय लोकांना पाडायचं की उभं करायचं हे ठरवण्यासाठी २९ ऑगस्टला अंतरवाली सराटीला या. त्यांना आता मराठ्यांची ताकदच दाखवायची आहे. एकदा होवूनच जावू दे. छत्रपतींच्या विचारांचे आपले रक्त असून मराठ्यांच्यात दम आहे की, त्यांच्यात आहे हे दाखवून देवू, असा इशारा मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange-Patil) यांनी आज कऱ्हाड (जि. सातारा) येथे राजकीय नेत्यांना दिला.

मराठा समाजाला (Maratha Community) ओबीसीतून आरक्षण मिळावे, सगेसोयरे यांना कुणबी दाखल्यांचे आरक्षण लागू करावे यासह अन्य मागण्यांसाठी मनोज जरांगे-पाटील यांनी महाराष्ट्रात मोठा लढा उभा केला आहे. त्याला मराठा समाजाचाही चांगला पाठिंबा मिळत आहे.

Manoj Jarange-Patil
Manoj Jarange-Patil : '...तर आमचे उमेदवार अपक्ष लढणार'; विधानसभा निवडणुकीबाबत मनोज जरांगेंचे मोठे विधान

जरांगे-पाटील यांच्याकडून महाराष्ट्रात शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. त्याअंतर्गत आज (शनिवार) साताऱ्यात शांतता रॅली रवाना होण्यापूर्वी जरांगे-पाटील कऱ्हाडला (जि. सातारा) काहीकाळ थांबले होते. त्यादरम्यान ते बोलत होते.

जरांगे म्हणाले, गरीब मराठा समाज एकत्र येवू लागल्याने मराठा समाजाला नावं ठेवलं जात आहे. काही कारणानिमित्त सर्वांना एकत्र येता येत नाही. मात्र, मराठा समाज एकत्र यायला लागल्यामुळे मराठा समाजाला हिणवायचे काम सुरु करण्यात आले आहे. संधी सापडली की मराठा समाजाला अडचणीत आणण्याचे काम सुरु आहे. कोणी कितीही हिणवले तरी मरेपर्यंत जरांगे-पाटील समाजासाठी उभा राहणार आहे.

Manoj Jarange-Patil
Manoj Jarange : 250 किलो फुलांचा 15 फुटी हार अन् 10 जेसीबीतून मनोज जरांगेंवर पुष्पवृष्टी; कराडात भव्य स्वागत

आरक्षण मिळेपर्यंत तुम्ही समाजासाठी मतभेद विसरुन एकत्र यायला पाहिजे. माझी त्यासाठीच झुंज सुरु आहे. ती झुंज वाया जावू देवू नका. लढून जिंकायचे आहे. मराठ्यांमध्ये एकजूट नाही हा संदेश जावू देवू नका, ही माझी विनंती आहे. जनता माझ्यासोबत आहे, त्यामुळे मी लढत आहे. मी बांधावर भाकरी खाणारा मराठा आहे. लोक असली नसली तरी मला विचार महत्त्वाचा आहे. २९ तारखेला अंतरवाली सराटीला या. एकदा पाडायचं की उभं करायचं हे ठरवू या. यांना आता मराठ्यांची ताकद दाखवायची वेळ आली आहे, असंही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.