कऱ्हाड (जि. सातारा) : राज्यातील ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि विलासकाका पाटील एकत्र आले आहेत. राज्यात असे कोठेही कॉंग्रेसच्या नेत्यांत मतभेद असतील तर ते दूर करून आम्ही सर्वांना एकत्र घेऊन कॉंग्रेस पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. कॉंग्रेसमध्ये इनकमिंग मोठ्या प्रमाणात होईल याची खात्री मला आहे. अनेक जण कॉंग्रेसच्या प्रवाहात येण्यासाठी इच्छुक असून, लवकरच ते येतील, असाही आशावाद मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.
कॉंग्रेस मेळाव्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम, माजी आमदार मोहन जोशी, ऍड. उदयसिंह पाटील, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश जाधव, कऱ्हाड दक्षिण कॉंग्रेस अध्यक्ष मनोहर शिंदे आदी उपस्थित होते. सध्या महाराष्ट्रात तीन पक्षांचे सरकार आहे. त्यामध्ये काही घडते. मंत्री अशोक चव्हाण यांनी व आम्ही नगरविकास विभागाला निधी कमी मिळाला, असे मुख्यमंत्र्यांकडे मांडले आहे. मुख्यमंत्र्यांनीही निधी देण्याचे मान्य केले आहे, असे सांगून श्री. थोरात म्हणाले, ""केंद्र सरकारने घाईघाईत कृषीविषयक कायदे मंजूर केले. त्या कायद्यांना कॉंग्रेसतर्फे विरोध करत आहोत. काही मूठभर लोकांसाठी कायदे तयार केले आहेत. त्यातून शेतकरी मोडून पडणार आहे.
कोल्हापूरला सतेज पाटील आणि सांगलीला विश्वजित कदम यांची जोरदार ट्रॅक्टर रॅली झाली. त्यातून शेतकऱ्यांत जागृती करण्याचे काम कॉंग्रेसकडून सुरू आहे. कायदा रद्द करावा, यासाठी दोन कोटी सह्या कॉंग्रेसच्या वतीने सोनिया गांधी यांच्याकडून राष्ट्रपतींना देणार आहोत. महाराष्ट्रातून 50 लाख लोकांच्या सह्या देणार आहोत. सध्या राज्यात साखर पडून आहे. 3,100 दर आहे. त्यातून एफआरपी कशी देणार? यंदा मागची साखर पडून आहे. यंदाची साखर येणार आहे. त्यामुळे एफआरपी कशी द्यायची हा कारखान्यापुढे प्रश्न आहे. दूध पावडर पडून आहे. त्याकडे केंद्र सरकारचे लक्ष नाही. त्यामुळे त्या उद्योगावर संकट आले आहे.
संपादन : बाळकृष्ण मधाळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.