'आधुनिक महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा महाविकास आघडीने मार्गी लावला होता. त्याचे समाधान आहे. मी मुख्यमंत्री असताना पहिल्यांदा आरक्षण दिले होते. मात्र, ते पुढे टिकले नाही.'
कऱ्हाड : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे-पाटील यांनी स्वाभिमानी आंदोलन उभे केले आहे. त्याला आधुनिक इतिहासात तोड नाही. अल्पभूधारक मराठ्यांना आरक्षणाची गरज आहे. त्यामुळे मी मुख्यमंत्री असताना २०१४ मध्ये १६ टक्के आरक्षण देऊन तो महत्त्वाचा निर्णय घेतला. राज्यातील मागसवर्गीय आयोगाच्या अध्यक्षांनाही विनंती केली होती. त्या वेळी त्यांनी नकार दिला होता. त्यानंतर आम्ही मंत्रिमंडळाची उपसमिती नेमून त्याची माहिती घेऊन आरक्षण दिले. मात्र, आमचे सरकार गेल्यानंतर आलेल्या सरकारने ते टिकवले नाही. त्यामुळे आता लढा सुरू आहे, अशी माहिती माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.