सातारा - ‘आम्हाला आमचे आरक्षण द्या, नाहीतर तुम्हाला पाडल्याशिवाय राहणार नाही. सत्ताधाऱ्यांनी जास्त त्रास दिला तर हा लढा मुंबईला नेण्याची आमची तयारी आहे. सगळ्या संकटांना सामोरे जाण्याची अगदी मरण पत्करण्याची मी तयारी ठेवली आहे..आगामी विधानसभा निवडणुकीत आम्ही ११३ आमदार पाडून समाजाचे वर्चस्व दाखवून देऊ, असे आव्हान मनोज जरांगे पाटील यांनी आज येथे दिले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांच्यावर कठोर शब्दांत टीका करत कितीही षड्ःयंत्रे रचली गेली तरी आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला..जरांगे यांची मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅली आज कोल्हापुरातून कराडमार्गे साताऱ्यात दाखल झाली. गांधी मैदानावरील सभेत जरांगे यांनी सज्जड शब्दांत सरकारला दम भरला. ते म्हणाले, ‘आपल्या पुढे संकटे उभी केली जात आहेत. यामध्ये सरकार, काही मराठा नेते आणि सत्ताधारीही सहभागी आहेत. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात आपण उमेदवार पाडणार असून मुंबईत आपण वेगळा प्लॅन करणार आहोत.’.‘सध्या मराठा समाजाचे समन्वयक फोडून आपल्यात दुफळी निर्माण करण्याचे काम दरेकर मावशी करत आहे. पण, त्याच्यामागे मी लागलो तर सुट्टी होऊ देणार नाही,’ असा इशारा त्यांनी प्रवीण दरेकरांना दिला. देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, ‘सध्या देवेंद्र फडणवीस घाम पुसायला तीन-चार रुमाल खिशात ठेवत आहेत. आगामी निवडणुकीत त्यांनाही पाणी पाजणार आहोत.’.भाषणानंतर चक्कर आली...सभेत भाषण करताना जरांगे यांनी आपली तब्बेत बरी नसल्याचे सांगत हातपाय थरथरु लागल्याचे सांगितले. ५४ मिनिटांपेक्षा जास्त वेळ भाषण सुरु होते. भाषण संपल्यानंतर त्यांना चक्कर आल्याने ते अचानक खाली बसले. त्यावेळी तेथे उपस्थित समन्वयकांनी त्यांना सावरले आणि पाणी दिले. तसेच त्यांना विश्रांतीसाठी हॉटेलवर नेले. त्यांना विश्रांती घेण्याची सूचना डॉक्टरांनी केली..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.