Maratha Reservation : माझ्या जातीच्या आड कोणी आलं, तर मी त्याला सोडणार नाही; जरांगेंचा भुजबळांना थेट इशारा

समाजासमाजात भांडणे लावून त्यांना दंगली घडवायच्या आहेत. मात्र, मराठा समाज ते कदापि होऊ देणार नाही.
Chhagan Bhujbal vs Manoj Jarange Patil
Chhagan Bhujbal vs Manoj Jarange Patilesakal
Updated on
Summary

मराठ्यांचे आरक्षण १८०५ पासून होते. जर मराठ्यांचे पुरावे होते तर ७० वर्षे कोणी लपवून ठेवले? याचे आता उत्तर पाहिजे.

कऱ्हाड : समाजासमाजात भांडणे लावून त्यांना दंगली घडवायच्या आहेत. मात्र, मराठा समाज ते कदापि होऊ देणार नाही. सरकारने त्यांना रोखावे, अन्यथा जशास तसे उत्तर द्यावे लागेल, असा इशारा मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange-Patil) यांनी आज मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि सरकारला येथे दिला.

दरम्यान, यशवंतराव चव्हाण यांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांना सुबुध्दी द्यावी, अशी प्रार्थना केल्याचेही त्यांनी यावेळी सांगितलं. जरांगे पुढे म्हणाले, मराठ्यांचे आरक्षण १८०५ पासून होते. जर मराठ्यांचे पुरावे होते तर ७० वर्षे कोणी लपवून ठेवले? याचे आता उत्तर पाहिजे. ज्यावेळी आरक्षणासाठी समिती नेमली. त्या-त्यावेळी मराठ्यांना आरक्षण नाही, असे सांगण्यात आले.

Chhagan Bhujbal vs Manoj Jarange Patil
Maratha Reservation : मनोज जरांगेंना आव्हान कशासाठी? आपण एकमेकांचे वैरी नाही; प्रकाश आंबेडकरांचे भुजबळांवर टीकास्त्र

आता पुरावा सापडू लागल्यावर मराठ्यांचे आरक्षण दबावामुळे लपवून ठेवले हे स्पष्ट झाले आहे. ते का लपवून ठेवले याचे उत्तर मिळाल्याशिवाय आता गप्प बसणार नाही. आपल्या मायबापाने काबाडकष्ट करुन पोरांना शिकवले. परंतु ना बापाचे, ना पोराचे स्वप्न पूर्ण झाले. आरक्षण नसल्याने स्वप्नांची राखरांगोळी झाली, आयुष्य उद्ध्वस्त झाले, असेही ते म्हणाले.

Chhagan Bhujbal vs Manoj Jarange Patil
Maratha Reservation : मनोज जरांगेंच्या पाठीमागे राजकीय शक्ती उभी; OBC नेते प्रकाश शेंडगेंचा गंभीर आरोप

सरकारने नेमलेल्या समितीला राज्याचा दर्जा दिला. आज लाखाने नोंदी सापडू लागल्या आहेत. लेकरांच्या पदरात आता फायदा पडणार आहे. मराठ्यांना आरक्षण मिळणार आणि मराठे ओबीसीत जाणार असे माहिती झाले आहे. तेव्हापासून काहींचा तिळपापड झाला आहे. माझ्या जातीच्या आड कोणी आला तर मी सोडणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()