Maratha Reservation : साताऱ्यात आतापर्यंत आढळल्या तब्बल सव्वा लाख कुणबी नोंदी; पाटण, जावळी तालुक्यात सर्वाधिक नोंदी

सर्वाधिक नोंदी पाटण, जावळी, सातारा तालुक्यात आढळल्या आहेत.
Maratha Reservation Kunbi Nondi
Maratha Reservation Kunbi Nondiesakal
Updated on
Summary

पुराव्यांच्या आधारे त्या-त्या गावातील मराठा समाजाला कुणबीचे दाखले दिले जात आहेत.

सातारा : जिल्ह्यात प्रशासनाने राबवलेल्या कुणबी नोंदीच्या (Kunbi Certificate) कार्यवाहीत आतापर्यंत सव्वा लाख नोंदी आढळल्या आहेत. यातील सर्वाधिक नोंदी पाटण, जावळी, सातारा तालुक्यात आढळल्या आहेत. त्यानुसार नागरिकांना कुणबी दाखले देण्याची प्रक्रिया तहसील कार्यालयातून सुरू आहे; पण काही नागरिकांकडूनही कुणबी नोंदीचे त्यांच्याकडील कागदपत्रे प्रशासनाकडे सादर करत आहेत. त्यातून दाखले देताना मात्र, प्रशासनाची अडचण होत आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी राज्यभर विविध ठिकाणी आंदोलने सुरू आहेत, तर मनोज जरांगे-पाटील यांनी सरकारला मराठा समाजाला आरक्षण जाहीर करण्याबाबत २४ डिसेंबरपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. या पार्श्वभूमीवर कुणबी दाखले देण्याची प्रक्रिया शासनाने राज्यभर सुरू केली आहे; पण त्यासाठीच्या पुराव्यांचा शोध सुरू आहे.

Maratha Reservation Kunbi Nondi
तोडगा न काढल्यास उदयनराजेंच्या नेतृत्वात पुणे-बंगळूर महामार्गाचं काम बंद पाडू; माजी आमदाराचा स्पष्ट इशारा

या पुराव्यांच्या आधारे त्या त्या गावातील मराठा समाजाला कुणबीचे दाखले दिले जात आहेत. त्यातून त्यांना ओबीसी प्रवर्गाच्या आरक्षणाचा फायदा मिळत आहे. जिल्हा प्रशासनाने सुरू केलेल्या कुणबीच्या जुन्या नोंदींच्या प्रक्रियेत आतापर्यंत जिल्ह्यात तब्बल सव्वा लाख नोंदी सापडल्या आहेत. मराठा कुणबी व कुणबी मराठा अशा नोंदी आहेत.

यामध्ये १९४८ ते १९६७ तसेच १९४८ पूर्वीच्या नोंदीची तपासणी करण्यात आली आहे. यासाठी सर्व शासकीय विभागातील जुने दस्तावेज तपासणी केली आहे. यामध्ये पाटण, जावळी, सातारा तालुक्यांत सर्वाधिक नोंदी आढळल्या आहेत, तर उर्वरित तालुक्यातही नोंदी सापडल्या आहेत. यानुसार ज्यांच्या नावाचे पुरावे सापडतील, त्यांना दाखले देण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Maratha Reservation Kunbi Nondi
पुन्हा वाद चिघळणार! 'कावेरी'ने कर्नाटक सरकारला दिले तामिळनाडूला 3128 क्युसेक पाणी सोडण्याचे आदेश

तपासणीशिवाय दाखले नाहीत

काही नागरिकांनी त्यांच्याकडे असलेल्या जुन्या दस्तावेजांत असलेल्या कुणबीच्या मोडी लिपीतील नोंदी असलेली कागदपत्रे प्रशासनाकडे सादर करत आहेत; पण या नोंदींची तपासणी केल्याशिवाय त्यांना दाखले दिले जात नाहीत.

Maratha Reservation Kunbi Nondi
OBC समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण द्या; उदयनराजेंचं PM मोदींना साकडं

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.