देशमुख हे साताऱ्यात आर्थिक गुन्हे शाखेत हजेरीसाठी जात असल्याची माहिती ईडीला मिळाली होती.
सातारा : मायणी मेडिकल कॉलेज (Mayani Medical College) प्रकरणात सातारा आर्थिक गुन्हे शाखेत हजेरीसाठी आलेल्या दीपक देशमुख यांना अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) पथकाने ताब्यात घेतले. मायणी मेडिकल कॉलेज अपहार प्रकरणातून गुन्ह्यांची मालिका दाखल झालेली आहे. वडूज पोलिस ठाणे तेथून सातारा आर्थिक गुन्हे शाखा व पुढे ईडीपर्यंत यातील गुन्हे वर्ग झालेले आहेत.