विकासाला चालना! शासनातर्फे अभयारण्याला विशेष दर्जा; मायणीकरांकडून निर्णयाचे स्वागत

विकासाला चालना! शासनातर्फे अभयारण्याला विशेष दर्जा; मायणीकरांकडून निर्णयाचे स्वागत
Updated on

मायणी (जि. सातारा) : येथील इंदिरा गांधी पक्षी अभयारण्य व परिसरातील कानकात्रे, सूर्याचीवाडी आणि येरळवाडी तलाव या पक्षी अधिवासाला वन्यजीव संवर्धन राखीव क्षेत्राचा दर्जा मिळाल्याने येथील नागरिक आनंदून गेले आहेत. येथील फ्रेंड्‌स ग्रुप सामाजिक संस्थेने पेढे वाटून आनंद व्यक्त केला.

हजारो किलोमीटरचे अंतर पार करून येथील ब्रिटिशकालीन मायणी तलाव, अभयारण्य व परिसरातील पाणवठ्यावर फ्लेमिंगो व अन्य परदेशी पक्षी दाखल होत असतात. त्यामुळे प्रसिद्ध पावलेल्या इंदिरा गांधी पक्षी अभयारण्य व परिसराला वन्यजीव संवर्धन राखीव क्षेत्राचा दर्जा मिळणे आवश्‍यक होते. अभयारण्य परिसराचा विकास करण्याची मागणी सातत्याने होत होती. त्याची दखल घेत राज्य वन्यजीव मंडळाने ठिकठिकाणच्या सात वनक्षेत्रांना वन्यजीव संवर्धन राखीव क्षेत्राचा दर्जा मिळण्यासाठी सादर केलेल्या प्रस्तावावर शासनाने काल मोहोर उमटवली. त्यामुळे वर्षानुवर्षे दुर्लक्षित असलेल्या येथील पक्षी अभयारण्य व परिसरातील वन्यजिवांच्या अधिवासाला न्याय मिळाला आहे. 

शासनाने वनक्षेत्र संवर्धनासाठी राखीव केल्यामुळे अभयारण्य विकासाला चालना मिळणार आहे. त्यासाठी वन विभागासह केंद्रीय पर्यावरण खात्याकडून विशेष निधीची तरतूद भविष्यकाळात होणार आहे. त्यामुळे पक्षी निरीक्षकांसह पर्यटकांसाठी विविध सोयी-सुविधा विकसित केल्या जातील. पर्यटकांमध्ये वाढ होऊन त्याचा अप्रत्यक्ष लाभ स्थानिक उलाढाल वाढण्यासाठी होणार आहे. त्यामुळे हॉटेल, लॉजिंग यासह विविध व्यावसायिक, नागरिकांनी शासनाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. स्थानिक निसर्गप्रेमी, पक्षीनिरीक्षक, विविध सामाजिक संस्था, युवा मंडळे आदींनीही आनंद व्यक्त केला. विविध उपक्रम राबवणाऱ्या व सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या येथील फ्रेंड्‌स ग्रुपने पेढे वाटून शासनाच्या निर्णयाचे अभिनंदन केले. 

अभयारण्य परिसराला वन्यजीव संवर्धन क्षेत्राचा दर्जा मिळाल्यामुळे पर्यटन वाढून विविध व्यावसायिकांना भविष्यात अच्छे दिन येतील. 
-अरुण जाधव, हॉटेल मालक, मायणी 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.