Black Wheat : शेतात फुलतोय काळा गहू; दोन शेतकऱ्यांचा प्रयोग

एरव्ही गहू म्हणाले, की तांबड्या, पिवळ्या रंगाचा गहू नजरेसमोर येतो. मात्र, शिवाजी भोसले व भानुदास डिगे यांनी त्यांच्या शेतात चक्क काळ्या गव्हाची लागवड केली आहे.
Black Wheat
Black WheatSakal
Updated on
Summary

एरव्ही गहू म्हणाले, की तांबड्या, पिवळ्या रंगाचा गहू नजरेसमोर येतो. मात्र, शिवाजी भोसले व भानुदास डिगे यांनी त्यांच्या शेतात चक्क काळ्या गव्हाची लागवड केली आहे.

मेढा - एरव्ही गहू म्हणाले, की तांबड्या, पिवळ्या रंगाचा गहू नजरेसमोर येतो. मात्र, येथील दक्षिण भागातील मालचौंडी गावातील शिवाजी भोसले व तांबी गावातील भानुदास डिगे यांनी त्यांच्या शेतात चक्क काळ्या गव्हाची लागवड केली आहे. या गव्हाचे पीक या परिसरात उत्तम प्रकारे येत असून, प्रायोगिक तत्त्वावर झालेली गव्हाची लागण पुढच्या वर्षी मोठ्या प्रमाणावर होईल, अशी शक्यता शेतकऱ्यांतून वर्तवली जात आहे.

पारंपरिक पद्धतीने शेती करत पिके घेतली जातात. मात्र, सध्याच्या काळात निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती करणेही जिकिरीचे बनले आहे. अनेकदा हातातोंडाशी आलेली पिके निसर्गाच्या अवकाळीपणामुळे शेतकऱ्यांच्या पदरी पडत नाहीत. त्यामुळे बहुधा शेतकरी हताश झालेला पाहायला मिळतो. मात्र, अशा परिस्थितीतही शेतीत नवा प्रयोग म्हणून जावळी तालुक्यातील तांबी तर्फ मेढा येथील शेतकरी भानुदास डिगे व मालचौंडी येथील शेतकरी शिवाजी भोसले यांनी त्यांचा शेतात काळ्या गव्हाच्या लागणीचा प्रयोग केला आहे.

काळा गहू हा बहुगुणी असून, हा आरोग्यासाठीही पोषक, तसेच अनेक आजारांवर मत करण्यासाठी फायदेशीर असल्याचे सांगण्यात येते. जावळी तालुक्यात प्रथमच या परिसरात काळ्या गव्हाची लागवड करण्यात आली. त्यामुळे हे पीक कसे येईल? याकडे शेतकऱ्यांचे लक्ष होते. मात्र, योग्य पद्धतीने लागवड व संगोपन केल्यामुळे तसेच या परिसरातील वातावरण या गव्हास पोषक असल्यामुळे गहू जोमात आला आहे. यातील एका शेतातील गव्हाची काढणी केली आहे. गव्हाला उताराही चांगला मिळाला आहे.

त्याची चपाती काळ्या रंगाचीच मात्र, खाण्यास चवदार आहे. त्यामुळे पुढील वर्षी हाच गहू शेतात लावणार असल्याचे दोन्ही शेतकऱ्यांनी व गहू पाहणीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांनी सांगितले. दरम्यान, काळ्या गव्हाच्या प्रयोगासाठी दोन्ही शेतकऱ्यांना अनिल दुधाणे यांचे मार्गदर्शन मिळाले.

अशी आहेत वैशिष्ट्ये...

या गव्हाला नबी एमजी असे नाव आहे. हा गहू काळ्या, निळ्या आणि जांभळ्या रंगात आढळतो. या गव्हाच्या चपात्यांचा उपयोग विविध आजारांवरील नियंत्रणासाठी होत असल्याचे सांगण्यात येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.