Satara : खरीपातील पेरणी सुरू असतानाच मोठी दुर्घटना; कृषी केंद्राला लागलेल्या आगीत 50 लाखांचं साहित्य जळून खाक

कृषी सेवा केंद्राला (Agricultural Service Center) आग लागून सुमारे ५० लाखांचे नुकसान झाले.
Agricultural Service Center
Agricultural Service Centeresakal
Updated on

पिंपोडे बुद्रुक : येथे कृषी सेवा केंद्राला (Agricultural Service Center) आग लागून सुमारे ५० लाखांचे नुकसान झाले. आज (बुधवार) पहाटे पाचच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

याबाबत अधिक माहिती अशी, की बसस्थानक परिसरात अनिल ढोले यांचे बी-बियाणे, औषधे व रासायनिक खते विक्रीचे मोठे दुकान आहे. नेताजी पाटील हा व्यवसाय सांभाळतात. या दुकानाला पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास शॉर्टसर्किटने आग लागली.

Agricultural Service Center
Karnataka : शेतकऱ्याला शिव्या देत चोरट्यांचा टोमॅटोवर डल्ला; पाठलाग करून पळवला अडीच टन टोमॅटोचा ट्रक

दत्तात्रय काशिनाथ महाजन यांच्या इमारतीत तळ मजल्यावर हे दुकान असून वरील दोन मजल्यावर महाजन कुटुंबीय वास्तव्याला असतात. बुधवारी पहाटेच्या वेळी शॉर्टसर्किटने दुकानातून धूर येऊ लागल्याचे मॉर्निंग वॉकला गेलेल्या नागरिकांच्या निदर्शनाला आले. माहिती समजताच लोक घटनास्थळी जमा झाले.

Agricultural Service Center
Nashik : बस दरीत कोसळून सप्तश्रृंगी घाटात भीषण अपघात; अजितदादांनी घेतली दखल, प्रशासनाला दिल्या 'या' सूचना

तत्पूर्वी इमारतीत राहायला असणाऱ्या दतात्रय महाजन व त्यांच्या पत्नी सुधा यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. आगीने रौद्ररूप धारण केल्याने ती विझवण्याचे धाडस होत नव्हते. दरम्यान, किसनवीर साखर कारखाना तसेच वाई नगरपरिषदेचे अग्निशमन बंब बोलावण्यात आले. मात्र ते वेळेत पोहोचले नाहीत.

त्यामुळे माजी सरपंच जनार्दन निकम, संतोष लेंभे यांचे पाण्याचे टँकर आणून त्यांच्यासह संजय महाजन, बाळासाहेब गार्डी, साहिल इनामदार व तरुणांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत खूप उशीर झाल्याने आगीने रौद्ररुप धारण केले होते. त्यामुळे संपूर्ण दुकान जळून खाक झाले.

Agricultural Service Center
Nashik Bus Accident : सप्तश्रृंगी घाटात भीषण अपघात; मृत महिलेच्या वारसाला मिळणार दहा लाख, CM शिंदेंची घोषणा

इमारतीतून मोठ्या प्रमाणात धुराचे लोट बाहेर पडत होते. सध्या खरीप हंगामातील पेरणी सुरू असल्याने बियाणे व खते व औषधांचा मोठा साठा दुकानात होता. गोडाऊनदेखील याच ठिकाणी असल्याने आगीत सुमारे ५० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.