'माझा पराभव झाला, पण 'स्वाभिमान' सत्ताधिशांच्या पायाशी ठेवला नाही'

Udaysingh Patil-Undalkar
Udaysingh Patil-Undalkaresakal
Updated on
Summary

'बऱ्याच जणांनी मला तडजोड करावी, असं सांगितलं. मात्र, सत्तेसाठी लाचारी पत्करुन काकांच्या विचारधारेला तिलांजली देणं मला योग्य वाटलं नाही.'

कऱ्हाड (सातारा) : लोकनेते विलासकाका पाटील यांनी अभयसिंहराजे भोसले (Abhaysinghraje Bhosle), लक्ष्मणराव पाटील (Laxmanrao Patil) यांच्यासह सहकाऱ्यांच्या मदतीने जिल्हा बॅंकेचा आर्थिक पाया रचला. विलासकाकांनी शेवटच्या श्वासापर्यंत तत्वाशी तडजोड केली नाही. बऱ्याच जणांनी मला तडजोड करावी, असं सांगितलं. मात्र, सत्तेसाठी लाचारी पत्करुन काकांच्या विचारधारेला तिलांजली देणं हे मला योग्य वाटलं नाही. त्यामुळं मी सत्तेपुढं न झुकता स्वाभिमानं लढलो, असं मत कॉंग्रेसचे सरचिटणीस अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर (Udaysingh Patil-Undalkar) यांनी व्यक्त केले.

सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीतील (Satara District Bank Election) पराभवानंतर अॅड. उंडाळकर यांच्या उपस्थितीत मतदारांचा आभार मेळावा झाला. त्याप्रसंगी ते बोलत होते. कॉंग्रेसचे कऱ्हाड दक्षिणचे अध्यक्ष मनोहर शिंदे, प्रा. काटकर, आप्पासाहेब गरुड, कोयना संघाचे अध्यक्ष वसंतराव जगदाळे, अविनाश नलवडे, शैलेश चव्हाण, हणमंतराव चव्हाण, प्रा. गणपतराव कणसे, उपसभापती रमेश देशमुख, बाजार समिती सभापती महादेव देसाई, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष रंगराव थोरात, कोयना बॅंकेचे अध्यक्ष रोहित पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील, प्रकाश पाटील, अशोकराव पाटील आदी उपस्थित होते.

Udaysingh Patil-Undalkar
मला अध्यक्षपदावर पुन्हा संधी द्या; भाजप आमदाराची अजित पवारांकडे मागणी

अॅड. उंडाळकर म्हणाले, ज्या मतदार संघाचे नेतृत्व काका करत होते. त्या मतदार संघातील ७० टक्के लोकांची मी निवडणूक लढवावी ही मागणी होती. दुर्दैवानं निवडणुकी मला काही मतांनी पराभव स्वीकारावा लागला. त्याला मी पराभव मानत नाही. मी सर्वसामान्य माणसांच्या जीवावर सत्तेशी झुंज दिली. प्रस्थापितांनीही ती झुंज शक्य झाली नसती. मात्र, रयत संघटनेच्या आणि कॉंग्रेस पक्षाच्या जीवावर मी झुंज दिली. मी जो वसा आणि वारसा सांगतो त्याला साजेशे काम करणे मला शक्य झाले याचा मला अभिमान आहे. जिल्हा बॅंकेसाठी मी माझा स्वाभिमान सत्ताधिशांच्या पायाशी ठेवला नाही. काकांना अनेक अडचणी आणण्यात आल्या, कुटुंब अडचणीत आणण्यात आले. त्यावेळीही काकांनी तडजोड केली नाही.

Udaysingh Patil-Undalkar
'सिल्व्हर ओक'वर ठरणार अध्यक्षपदाचा दावेदार

त्यासाठी आम्हीही त्यांच्या विचाराशी बांधिल आहे. काकांनी उभ्या केलेल्या संस्थांचा आलेख चढता आहे. भविष्यात कऱ्हाड तालक्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका येत आहे. कॉंग्रेस पक्ष म्हणून संघटनेतील कार्यकर्ते जबाबदारीने मागे-पुढे सरकून निवडणुका लढण्यासाठी तयार व्हा. संघटनेला कुठेही बट्टा लागेल, असं कोणतंही काम कधीही माझ्याकडून होणार नाही. मनोहर शिंदे यांनी यापुढील निवडणुका माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या माध्यमातून कॉंग्रेसच्या चिन्हावर लढवू, असं सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.