Central Railway : 'या' रेल्‍वेमार्गावर गुरुवारपर्यंत मेगा ब्‍लॉक; काही गाड्या रद्द, काहींच्या वेळापत्रकावर परिणाम

या ब्लॉकमुळे गाडी क्रमांक ०१०२४ कोल्हापूर- पुणे एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे.
Mega Block on Pune- Miraj Railway
Mega Block on Pune- Miraj Railwayesakal
Updated on

कोरेगाव/कऱ्हाड : मध्य रेल्वेच्‍या (Central Railway) पुणे विभागातील पुणे-मिरज मार्गावर (Pune-Miraj Route) तारगाव-मसूर-शिरवडे (जि. सातारा) दरम्यान रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण, विविध अभियांत्रिकी, सिग्नलिंग दूरसंचार कामांसाठी गुरुवारअखेर (ता. २२) वाहतूक बंद ठेवण्‍यात येणार आहे. त्यामुळे काही गाड्या रद्द, काही अंशतः रद्द, तर काही गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.

या ब्लॉकमुळे ता. २० आणि २१ फेब्रुवारी रोजीची गाडी क्रमांक ०१०२४ कोल्हापूर- पुणे एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे, तसेच गाडी क्रमांक ०१०२३ पुणे-कोल्हापूर एक्स्प्रेस या दोन गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. २२ फेब्रुवारीला सुटणारी गाडी क्रमांक ११०३० कोल्हापूर-मुंबई कोयना एक्स्प्रेस (Kolhapur-Mumbai Koyna Express) व गाडी क्रमांक ११०२९ मुंबई-कोल्हापूर कोयना एक्स्प्रेस या दोन्ही गाड्या रद्द केल्‍या आहेत. ता. २३ रोजी गाडी क्रमांक ०१०२३ पुणे- कोल्हापूर एक्स्प्रेस रद्द (Pune-Kolhapur Express Cancelled) करण्यात आली आहे.

Mega Block on Pune- Miraj Railway
आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांसाठी महत्त्वाची बातमी; साताऱ्यात 'सेफ हाउस'ची निर्मिती, काय आहे खासियत?

काही गाड्यांचे शॉर्ट टर्मिनेशन/शॉर्ट ओरिजिनेशन होणार आहे. ते पुढीलप्रमाणे : २१ आणि २२ फेब्रुवारी रोजी सुटणारी डेमू क्रमांक ०१५४२ कोल्हापूर- सातारा या गाडीचा प्रवास कऱ्हाड येथे संपेल. तर डेमू क्रमांक ०१५४१ सातारा-कोल्हापूरचा प्रवास कऱ्हाड येथून कोल्‍हापूरकडे सुरू होईल. म्हणजेच ही गाडी सातारा- कऱ्हाडदरम्यान रद्द राहील. २१ आणि २२ फेब्रुवारीला सुटणारी गाडी क्रमांक ११४२५ पुणे-कोल्हापूर एक्स्प्रेसचा प्रवास सातारा येथे संपेल आणि गाडी क्रमांक ११४२६ कोल्हापूर-पुणे एक्स्प्रेस सातारा येथून पुण्‍यासाठी सोडण्यात येईल म्हणजेच ही गाडी कोल्हापूर-सातारा दरम्यान रद्द राहील.

Mega Block on Pune- Miraj Railway
आज ना उद्या देशाच्या संसदेला आर्थिक निकषावर आरक्षण द्यावंच लागेल; शिवेंद्रराजेंचं मोठं विधान

२१ फेब्रुवारी रोजी गोंदिया येथून सुटणारी गाडी क्रमांक ११०४० गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेसचा प्रवास पुण्यात संपेल, तर २२ फेब्रुवारी रोजी कोल्हापूर येथून सुटणारी गाडी क्रमांक ११०३९ कोल्हापूर- गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस पुणे येथूनच सुटेल. म्हणजेच ही गाडी कोल्हापूर-पुणेदरम्यान रद्द राहील. हे मेगा ब्लॉक दुहेरीकरण, पायाभूत सुविधांची देखभाल आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहे. या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची दिलगिरी व्यक्त केली असून, सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

Mega Block on Pune- Miraj Railway
भारतातील 'ही' पहिली बुलेट ट्रेन वाऱ्याशी करणार स्पर्धा; बंदुकीतील गोळीच्या वेगाचाही चुकवणार अंदाज!

मार्गात बदल केलेल्‍या गाड्या

ता. २१ फेब्रुवारी रोजी हजरत निजामुद्दीन येथून सुटणारी गाडी क्रमांक १२६३० हजरत निजामुद्दीन- यशवंतपूर एक्स्प्रेस दौंड- कुर्डूवाडी- पंढरपूर- मिरज या वळवलेल्या मार्गाने धावेल. ही गाडी पुण्याला येणार नाही. ता. २१ फेब्रुवारी रोजी बंगळूरहून सुटणारी गाडी क्रमांक १६५०५ बंगळूर-जोधपूर एक्स्प्रेस मिरज- पंढरपूर- कुर्डूवाडी- दौंड-पुणे या वळवलेल्या मार्गावर धावेल. ही गाडी सांगली, कऱ्हाड, सातारा येथे येणार नाही, तसेच १७ व १८ फेब्रुवारी रोजी कोल्हापूरहून सुटणारी गाडी क्रमांक ११०३० कोल्हापूर -मुंबई कोयना एक्स्प्रेस कोल्हापूर येथून नियमित सुटण्याची वेळ ०८.१५ ऐवजी १०.१५ वाजता अर्थात दोन तास उशिराने सुटेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()