म्हसवडला तलवारी नाचवत घरफोड्या ; पाच घरे फोडली

अज्ञातांनी पाच घरे फोडली; सोने-चांदीचे दागिने, रोख रक्कम लंपास
Satara Crime News
Satara Crime Newsesakal
Updated on

म्हसवड : हातात तलवारी व इतर शस्त्रे बाळगून पाच अज्ञात चोरट्यांनी आज पहाटे येथील भरवस्तीतील सणगर गल्लीतील विद्यमान नगरसेवकासह इतर पाच अशी सहा घरे फोडली. मुख्य बाजारपेठ, माळी गल्ली, शिक्षक कॉलनी परिसरातील चार बंद घरांची कुलपे तोडून मोबाईल रोख रक्कम असा एकूण सुमारे सव्वालाखाचा ऐवज लंपास केला. हे चोरटे २० ते २५ वयोगटातील असून, सीसीटी टीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.

म्हसवड पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, नगरसेवक केशव कारंडे हे घरास कुलपे लावून कुटुंबासहत परगावी गेले होते. त्यांच्या बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरातील तीन सोन्याच्या अंगठ्या, एक चांदीचा छल्ला व आठ जोडवी, दोन दिवे, अंगठी व चांदीची मोड, कानातील सोन्याच्या टॉप्स, सोन्याची नथ, नाकातील चमकी व दोन सोन्याच्या वळ असा एकूण ७३ हजारांचा ऐवज चोरून नेला. याच गल्लीतील सुमन बलभीम सासणे हे देखील परगावी गेल्याने त्यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी दहा ग्राम सोन्याची फुले, जुबे, साखळी, आठ ग्रॅम सोन्याची बोरमाळ, सोन्याची नथ, सोन्याचे २० मणी, पाच ग्रॅम वजनाच्या दोन नक्षीच्या अंगठ्या असा एकूण ३६ ग्रॅम वजनाचे सोन्याची दागिने व दोन हजार रुपये असा एकूण एक लाख ४६ हजार रुपयांचा ऐवज लांबविला.

याच परिसरातील सासणे बोळातील सरस्वती महेश ईकारे यांच्या बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. तेथीलच कैलास चौधरी यांच्याही घरातून सहा हजार रुपये चोरट्यांनी लांबविले. महादेव कारंडे, राजू गोंजारी, मानसी सासणे यांच्या घरात चोरट्यांनी प्रवेश केला; परंतु त्यांच्या हाती काहीच लागले नाही. मुख्य बाजार पेठेतील शहरात दहा ते १२ ठिकाणी चोरट्यांनी घरफोडी करण्याचा प्रयत्न केला असला, तरी अद्याप दोनच जणांनीच याबाबत म्हसवड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. या सर्व ठिकाणी चोरट्यांनी घरफोडी करीत दहशत निर्माण करताना तलवारी नाचवल्या असल्याचे शहरातील एका ठिकाणी लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाले असून, पोलिसांनी फिर्याद दाखल होताच हे चित्रीकरण ताब्यात घेतले असून, चोरीचा छडा लावण्यासाठी शहरात श्वान पथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण केले आहे.

चोऱ्यांचे सत्र सुरूच...

म्हसवडमध्ये एकाच रात्रीत दहा ते बारा घरे फोडण्याचा हा पहिलाच प्रकार असून, या घटनेमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. गेल्याच महिन्यात दिवसा बंद घराचे कुलूप तोडून सुमारे अडीच लाखाचा ऐवज चोरट्यांनी लांबविला होता. त्यानंतर ढाकणी येथील श्री सिद्धनाथ देवस्थान मंदिरातील ‘श्रीं’च्या दोन किलोच्या चांदीच्या मूर्ती दिवसाच चोरट्यांनी लांबविल्या. त्यापाठोपाठ वरकुटे- म्हसवड येथील तीन घरे दिवसा फोडून सुमारे अडीच लाखांचे दागिने व रोख रक्कम चोरट्यांना लंपास केली होती. या एकाही चोरीचा तपास लावण्यात पोलिसांना यश आले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.