म्हसवडची एमआयडीसी रद्द होणार नाही

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ग्वाही दिल्याची रणजित निंबाळकर यांची माहिती
MIDC of Mhaswad will not be cancelled Ranjit Nimbalkar
MIDC of Mhaswad will not be cancelled Ranjit Nimbalkar
Updated on

म्हसवड - माण तालुक्यातील म्हसवड, मासाळवाडी, धुळदेव येथील मुंबई- बंगळूर केंद्रीय एमआयडीसी रद्द करून इतरत्र नेण्यात येणार नसल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यांनी दिली असल्याची माहिती खासदार रणजित नाईक निंबाळकर यांनी दिली.

राज्यातील सत्ता बदलापूर्वी घाईगडबडीने मंजूर केलेले अनेक परिपत्रके, आदेश अमलात आणण्यापूर्वी संबंधित आदेशाचा अभ्यास करण्यासाठी राज्यातील सरकारने काही आदेशास स्थगिती दिली होती. यामध्ये म्हसवड येथील एमआयडीसी मंजुरी आदेशास स्थगिती दिली असली, तरीही येथील एमआयडीसी इतरत्र कुठेही हलविण्यात येणार नाही. म्हसवड येथील एमआयडीसी मंजुरीबाबतचे २२ जूनचे आदेश रद्द करून इतरत्र ती नेण्यात येणार नाही. याबाबत मी स्वत: आमदार जयकुमार गोरे यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन म्हसवड एमआयडीसीबाबतचे त्यांना निवेदन दिले. त्यांच्याशी चर्चाही केली. त्यानंतर त्यांनी म्हसवड येथील एमआयडीसी कोरेगाव, साताऱ्याकडे नेली जाणार नाही. ती म्हसवड येथेच होणार असल्याची त्यांनी सांगितले.

खासदार नाईक निंबाळकर म्हणाले, ‘‘माझ्या माढा लोकसभा मतदारसंघातील माण -खटाव मतदारसंघात म्हसवड, मासाळवाडी, धुळदेव येथे मुंबई-बंगळूर ही केंद्रीय एमआयडीसी मंजूर झाली आहे. यालगतच्या माढा लोकसभा मतदारसंघातील व त्या नजीकच्या खटाव, माळशिरस, पंढरपूर, आटपाडी, सांगोला इत्यादी तालुक्यांतील बेरोजगार तरुण व नव उद्योजकांना याचा लाभ होणार आहे. याबरोबरच म्हसवड येथील नियोजित कॉरिडॉर एमआयडीसीसाठी गरजेचा फलटण- पंढरपूर लोहमार्गासाठी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव व केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची दिल्ली येथे नुकतीच भेट घेतली. त्यांच्याशी झालेल्या चर्चेत फलटण-पंढरपूर या प्रलंबित लोहमार्ग तातडीने मार्गी लागणार आहे, तसेच कृष्णा- भीमा स्थैरीकरण, नीरा- देवघर पाणी प्रश्न, नाईकबोमवाडी (फलटण) एमआयडीसी, जिहे- कटापूरसाठी निधी व इतर मतदारसंघातील विकासकामावर चर्चा झाल्याचे खासदार निंबाळकर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.