Satara News : सातारा जिल्हा रुग्णालयात होणार मिल्क बँक; सुदृढ पिढीसाठी जिल्हा परिषदेचा पुढाकार; लवकरच प्रारंभ

आईचे दूध हाच बाळाचा सर्वात उत्तम आहार आहे. त्यामध्ये प्रथिने, स्निग्ध पदार्थ तसेच जीवनसत्त्वे, क्षार आणि रोगप्रतिबंधक घटक असतात.
Milk Bank held in Satara District Hospital Zilla Parishad initiative for healthy generation
Milk Bank held in Satara District Hospital Zilla Parishad initiative for healthy generationSakal
Updated on

सातारा : मातेचे पुरेशे दूध न मिळणाऱ्या बालकांच्या वाढीवर विपरीत परिणाम होत असतो. त्यामुळे देशाची भावी पिढी सुदृढ करण्यासाठी जिल्हा परिषदेचा महिला व बालकल्याण विभागामार्फत जिल्हा रुग्णालयात ब्लड बॅंकेप्रमाणचे मिल्क बॅंकही तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे पोषक घटक पुरेशा प्रमाणात मिळून लहान मुलांची योग्य वाढ होण्यास मदत होणार आहे.

मातेचे दूध सर्वोत्तम आहार

आईचे दूध हाच बाळाचा सर्वात उत्तम आहार आहे. त्यामध्ये प्रथिने, स्निग्ध पदार्थ तसेच जीवनसत्त्वे, क्षार आणि रोगप्रतिबंधक घटक असतात. त्यामुळे बाळासाठी आईच्या दुधाची तुलना इतर कुठल्याही दुधाशी करता येत नाही. हे दूध पचायला हलके असते. बाळाच्या वाढीस जरूर असणारे सर्व पोषक घटक योग्य त्या प्रमाणात असतात.

बाळाला कावीळ, जुलाब आदी आजारांपासून संरक्षण मिळते, तसेच बाळाचा ॲलर्जी व दम्यापासूनही बचाव होण्यास या दुधाची मदत होते. भावी आयुष्यात स्थूलता, रक्तदाब, हृदयविकार व मधुमेह अशा आजारापासून बाळाला संरक्षण मिळते.

अनेकांना मिळत नाही पुरेसे दूध

अनेक महिलांना पुरेशा प्रमाणात दूध येत नाही. त्यासाठी विविध औषधे, खाण्यापिण्यातील बदल असे उपाय करूनही आईला पुरेसे दूध येत नाही. काही घटनांमध्ये आईचा आजार विचारात घेऊन बाळा दूध पाजता येत नाही, तर क्वचित घटनांमध्ये आईला धोका निर्माण झाल्यावरही बाळ तिच्या दुधापासून वंचित राहते.

त्याचा बाळाच्या वाढीवर परिणाम होत असतो. ते आजारी पडण्याचे प्रमाण वाढू शकते. त्याचबरोबर पुढील आयुष्यातही त्याच्या आरोग्यावर विपरित परिणामांना सामोरे जावे लागू शकते.

मिल्क बॅंकेची संकल्पना

रक्त रासायनिक प्रक्रियेतून तयार करता येत नाही. त्यामुळे रक्तदानाची व ते साठविण्यासाठी ब्लड बॅंकेची संकल्पना पुढे आली. त्यामुळे अनेकांचे जीव वाचविण्यात मदत होते आहे. तशीच अवस्था ही आईच्या दुधाची असते. आईच्या दुधाएवढ्या ताकदीचे कोणतेही दूध अद्याप तयार करता आलेले नाही.

एक हजार स्क्वेअर फूट जागेची आवश्‍यकता

जिल्हा रुग्णालयामध्ये सर्वाधिक प्रसूती होत असतात. त्यामुळे जिल्ह्यातील हा पहिला प्रकल्प जिल्हा रुग्णालयात करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा रुग्णालयात एक हजार स्क्वेअर फूट जागा लागणार आहे. ती उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे यांची मदत घेतली जाणार आहे.

सातारा जिल्ह्यात मिल्क बॅंकेचा प्रकल्प नाही. त्यामुळे दूध कमी असणाऱ्या मातांच्या बाळांच्या वाढीवर मर्यादा येतात. त्यामुळे हा प्रकल्प जिल्ह्यात अत्यंत महत्त्वाचा आहे. कोल्हापूरमध्ये असलेल्या अशा प्रकल्पाच्या पाहणीसाठी नुकतेच एक पथक पाठविले होते. येत्या दोन दिवसांत त्यावर चर्चा करून प्रकल्पाला अंतिम स्वरूप देणार आहे.

- याशनी नागराजन, मुख्य कार्यकारी अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.