Satara News : कोयना विभागात मिनी महाबळेश्वर

मुख्यमंत्र्यांची संकल्पना : एमएसआरडीसीद्वारे होणार विकास
Mahabaleshwar
Mahabaleshwaresakal
Updated on

सातारा : शिवसागर जलाशयाच्या बॅक वॉटर परिसरातील गावांच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांनी विशेष पाऊल उचलले आहे. या परिसरातील २० ते ३० गावांचा मिनी महाबळेश्वर प्रकल्पामध्ये समावेश करून त्यांचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास करून स्वयंपूर्ण केले जाणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) माध्यमातून येथे विकासकामे होतील.

त्यामुळे जुन्या महाबळेश्वरवरील ताण कमी होऊन शिवसागर जलाशयाच्या परिसरातील गावांत पर्यटन बहरणार आहे. सह्याद्रीच्या रांगात वसलेल्या गावांच्या विकासाकडे नेहमी दुर्लक्ष झाले आहे. कोयनेच्या बॅक वॉटर परिसरात मोठ्या प्रमाणात गावे आहेत. या गावांचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास केल्यास महाबळेश्वर, पाचगणीवरील पर्यटकांचा ताण कमी होऊ शकतो.

हे ओळखून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या परिसरातील गावांच्या विकासाकडे लक्ष दिले आहे. त्यासाठी शिवसागर जलाशयाच्या बॅक वॉटर परिसरातील गावांच्या परिसरात मिनी महाबळेश्वर प्रकल्प उभारण्यात येत आहे.

काससोबत सातारा, पाटण, जावळी या तीन तालुक्यांतील ५२ गावांचा या प्रकल्पाअंतर्गत समावेश करण्यात आला आहे. या प्रकल्पातंर्गत तीन तालुक्यांतील सुमारे ३७ हजार २५८ हेक्टर क्षेत्र विकसित केले जाणार आहे.

या प्रकल्पाची संपूर्ण जबाबदारी सरकारची मालकी असणाऱ्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची असेल. या प्रकल्पात सातारा तालक्यातील ८, जावळी तालुक्यातील १५, तर पाटण तालुक्यातील २९ गावांचा समावेश करण्यात येणार आहे. नवीन महाबळेश्वर प्रकल्पाची उभारणी करण्यात आल्यावर या सर्वच गावांतील पर्यटनाला चालना मिळून या गावात नवीन रोजगारनिर्मिती होण्यास मदत होईल.

या प्रकल्पात शिवसागर जलाशय परिसरातील २० ते ३० गावांचा समावेश आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकल्पात लक्ष घातले आहे. त्यासाठी महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळांतर्गत मुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसागर जलायशाच्या परिसरातील गावांचा अंतर्भाव केला जाणार आहे.

त्यामुळे गेली अनेक वर्षे विकासाच्या प्रतीक्षेत असलेल्या या परिसरातील २० ते ३० गावांत विविध विकासकामे होतील. ज्यामधून पर्यटक आकर्षित होऊन या परिसरात पर्यटन वाढीस मदत होईल. गावांनाच चांगल्या पद्धतीने रस्ते, जलाशयांवर विविध ठिकाणी आधुनिक पूल, स्टे होमची संकल्पना, इको टुरिझम, टेंटमध्ये राहण्याची सुविधा, जंगल सफारी, स्ट्रॉबेरीसह इतर शेती उत्पादने येथे उपलब्ध होतील.

शेतीप्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून जॅम, जेली, मध आदी उत्पादनेही उपलब्ध होण्यासाठी या गावातील लोकांना विविध योजनांच्या माध्यमातून चालना दिली जाईल. अनेक ठिकाणी पाहणी मनोरे, झुलते पूल, स्टे वायर पूल आदींचीही निर्मिती केली जाणार आहे.

त्यामुळे पर्यटक या निसर्गाच्या आविष्काराचा आनंद घेऊ शकतील. एमएसआरडीसीच्या अंतर्गत येथे पायाभूत सुविधांची कामे होतील. त्यामुळे जुन्या महाबळेश्वरला पर्याय म्हणून मिनी महाबळेश्वर प्रकल्प लवकरच आकाराला येणार आहे.

सुमारे ३० गावांचा पर्यटन विकास...

शिवसागर जलाशयाच्या परिसरातील २० ते ३० गावांत या प्रकल्पाच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने रस्ते, जलाशयांवर विविध ठिकाणी आधुनिक पूल, स्टे होमची संकल्पना, इको टुरिझम, टेंटमध्ये राहण्याची सुविधा, बोटिंग, स्कूबा डायव्हिंग, जंगल सफारी, स्ट्रॉबेरीसह इतर शेती उत्पादने येथे उपलब्ध होतील. शेती प्रक्रिया उद्योग उभारणी केली जाऊ शकते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()