लग्न समारंभात फोटो काढताना मास्कचा वापर करा; पालकमंत्र्यांचं आवाहन

Wedding Ceremony
Wedding Ceremonyesakal
Updated on

सातारा : जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे (corona patient) बाधित होण्याचे प्रमाण 10 टक्क्याच्या आत आल्यामुळे जिल्ह्यात लॉकडाउनला (coronavirus lockdown) शिथिलता दिली आहे. नागरिकांनी गाफील न राहता बाजारपेठेमध्ये गर्दी करु नये, तसेच प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करुन स्वत:ला व दुसऱ्यांना कोरोनाचा प्रादुभार्व होणार नाही याची खरबदारी घ्यावी, असे आवाहन पालकमंत्री बाळासाहेब पाटील (Guardian Minister Balasaheb Patil) यांनी केले. (Minister Balasaheb Patil Appeal To Use A Mask While Taking Photo At Wedding Ceremony)

Summary

लग्न समारंभात मास्कचा वापर केला जात नसल्याचे निदर्शनास आले असल्याचे मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.

जिल्ह्यातील कोरोना संदर्भातला आढावा पालकमंत्री श्री. पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात घेतला. यावेळी त्यांनी जनतेला आवाहन केले. या बैठकीला जिल्हाधिकारी शेखर सिंह (Collector Shekhar Singh), मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा (Chief Executive Officer Vinay Gowda), पोलीस अधीक्षक अयजकुमार बन्सल, अप्पर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Wedding Ceremony
VIDEO पाहा : 'आंदोलनाची नौटंकी करण्यापेक्षा भुजबळांनी सत्तेतून बाहेर पडावं'

प्रत्येक नागरिकाने घराबाहेर पडताना मास्कचा वापर, सुरक्षित अंतर पाळले पाहिजे व वेळोवेळी सॅनिटायझरचा वापर केला पाहिजे, असे आवाहन करुन पालकमंत्री पाटील पुढे म्हणाले, जिल्ह्यात कोरोना रुग्ण आढळण्याची संख्या कमी झाली आहे. कुणीही कोरोना गेला, असे समजू नये. प्रत्येकाने दक्षता घेतली पाहिजे. लग्न समारंभामध्ये मास्कचा वापर केला जात नसल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच लग्न समारंभात फोटो काढताना मास्क घालत नाहीत, यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. लग्न समारंभातील उपस्थितांनी मास्कचा वापर करावा, असे आवाहनही पालकमंत्री पाटील यांनी केले आहे.

Minister Balasaheb Patil Appeal To Use A Mask While Taking Photo At Wedding Ceremony

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.