बैल थकलेला असेल तर शर्यत जिंकणं कठीण, तसंच क्षमता संपलेला नेता असेल तर..; रवींद्र चव्हाणांचा पृथ्वीराज चव्हाणांना टोला

अतुल भोसले उमदे नेतृत्व आहेत. ते सर्व विषयांना न्याय देतील. त्यांना साथ देणे गरजेचे आहे.
Ravindra Chavan vs Prithviraj Chavan
Ravindra Chavan vs Prithviraj Chavanesakal
Updated on
Summary

बैलगाडी शर्यतीवेळी एकास एक बैल असेल, तर ती शर्यत जिंकता येते. बैल (Bull) थकलेला असेल तर शर्यत जिंकणे कठीण राहते.

शेणोली : मी शहरी भागात वावरलो असलो, तरी मला शेती आणि बैलांचा नाद आहे. बैलगाडी शर्यतीवेळी एकास एक बैल असेल, तर ती शर्यत जिंकता येते. बैल (Bull) थकलेला असेल तर शर्यत जिंकणे कठीण राहते. तशाच प्रकारे पूर्ण क्षमता संपलेला लोकप्रतिनिधी असेल, तर त्या मतदारसंघातील परिस्थिती काय असेल, हे सांगायला नको, अशी टीका नाव न घेता माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांच्यावर सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी केली.

कापील (ता. कऱ्हाड) येथे कापील विकास सेवा सोसायटीचा शताब्दी महोत्सव सोहळा व अतुल भोसले यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या विविध विकासकामांच्या भूमिपूजन समारंभात ते बोलत होते. यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले अध्यक्षस्थानी होते.

Ravindra Chavan vs Prithviraj Chavan
Loksabha Election : महायुती की महाविकास आघाडी? लोकसभा निवडणुकीबाबत राजू शेट्टींनी घेतला मोठा निर्णय

आमदार जयकुमार गोरे, भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, विक्रम पावसकर, मनोज घोरपडे, कृष्णा सहकारी बँकेचे अध्यक्ष अतुल भोसले, रामकृष्ण वेताळ, कृष्णाचे उपाध्यक्ष जगदीश जगताप, संचालक धोंडिराम जाधव, निवासराव थोरात, कृष्णा सहकारी बँकेचे संचालक विजय जगताप, सार्वजनिक बांधकामचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, विकास सेवा सोसायटीचे अध्यक्ष दीपक जाधव, उपाध्यक्ष महादेव कुंभार, सर्व संचालक यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

Ravindra Chavan vs Prithviraj Chavan
तुम्ही माझी काय इज्जत राखली? अजितदादांच्या नाराजीचे उलटसुलट अर्थ; आमदार सुमनताई, रोहित पाटलांचे मौन

मंत्री चव्हाण म्हणाले, ‘‘अतुल भोसले उमदे नेतृत्व आहेत. ते सर्व विषयांना न्याय देतील. त्यांना साथ देणे गरजेचे आहे. मतदारांनी अतुल भोसले आणि भाजपच्या पाठीशी उभे राहावे.’’ डॉ. सुरेश भोसले यांचेही भाषण झाले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. त्यानंतर चव्हाण यांनी सोसायटीच्या कार्यालयास भेट दिली व सोसायटीच्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. दीपक जाधव, महादेव कुंभार व सर्व संचालकांनी उपस्थितांचे स्वागत केले. सुभाष जाधव यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.