सातारा : जिल्ह्यात कडक निर्बंध असल्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह रेट (Corona positive rate) काही प्रमाणात कमी झाला आहे. पॉझिटिव्ह रेट आणखीन कमी करण्यासाठी विविध उपाय योजना करुन कोरोना टेस्टींगचे (Corona Testing) प्रमाण वाढवावे, अशा सूचना गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शभूराज देसाई (Minister Shambharaj Desai) यांनी केल्या. (Minister Shambharaj Desai Suggestion To The Government To Increase The Rate Of Corona Testing Satara Marathi News)
सातारा जिल्ह्यात कडक निर्बंध असल्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह रेट काही प्रमाणात कमी झाला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात आज गृह राज्यमंत्री श्री. देसाई यांनी जिल्ह्यातील कोरोना संसर्गाबाबतचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी सूचना केल्या. या बैठकीला जिल्हाधिकारी शेखर सिंह (Collector Shekhar Singh), मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण आदी उपस्थित होते.
लसीकरण केंद्रावर (Vaccination Center) नागरिकांना टोकन दिल्यानंतर त्या नागरिकांना सकाळी 9 ते 11 या वेळेतच लसीकरण करावे. तसेच जो नागरिक कोरोना बाधित झाला आहे, त्याच्या संपर्कात जे-जे आले आहेत त्या सर्वांचा शोध घ्यावा. तिसऱ्या लाटेत लहान मुले अधिक बाधित होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्या दृष्टीने आत्तापासूनच तयारी करावी. त्यांच्या उपचारासाठी स्वतंत्र इमारती ताब्यात घ्याव्यात, अशा सूचनाही मंत्री देसाई यांनी बैठकीत केल्या.
Minister Shambharaj Desai Suggestion To The Government To Increase The Rate Of Corona Testing Satara Marathi News
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.