खतांच्या दरवाढीवर खोतांचा निशाणा; शंभूराज देसाईंचं सदाभाऊंना खुलं आव्हान

Shambhuraj Desai
Shambhuraj Desaiesakal
Updated on

सातारा : कोरोना संकटाच्या काळात खतांची दरवाढ करून शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचे काम केंद्रातील भाजप सरकारने केले होते. त्याच पक्षाचे माजी मंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) हे राज्य सरकारवर टीका करत आहेत. खोत यांनी समोरासमोर यावे. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारने शेतकऱ्यांना किती मदत केली आणि तुमच्या काळात किती मदत झाली. यावर समोरासमोर येऊन चर्चा करण्यास महाविकास आघाडीतील मंत्री म्हणून मी तयार आहे, असे आव्हान गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई (Minister Shambhuraj Desai) यांनी श्री. खोत यांना दिले आहे. (Minister Shambhuraj Desai Criticism Of Sadabhau Khot Satara Political News)

Summary

कोरोना संकटाच्या काळात खतांची दरवाढ करून शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचे काम केंद्रातील भाजप सरकारने केले होते.

माजी मंत्री खोत यांनी महाविकास आघाडी सरकारने चक्रीवादळात (Cyclone Tauktae) झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीची भरपाई करावी, असे वक्तव्य केले होते. यावर शंभूराज देसाई संतप्त झाले आहेत. त्यांनी त्यांना समोरासमोर येऊन चर्चा करण्याचे आव्हान दिले आहे. श्री. देसाई म्हणाले, ""मला या गोष्टीची किव येते, की कृषी खात्याचे राज्यमंत्रिपद सदाभाऊ खोत यांनी सांभाळले आहे. त्यांनी अपुऱ्या माहितीच्या आधारे महाविकास आघाडी सरकारवर टीका करणे योग्य नाही. सर्वात मोठी कर्जमुक्तीची योजना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या सरकारने राबविली आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्या आल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्ती दिली. यातून 22 हजार कोटी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले.

Shambhuraj Desai
देशसेवा आली फळाला! माजी सैनिकाकडून सापडलेल्या नोटांचे बंडल प्रामाणिकपणे परत

विविध वादळे असून देत किंवा कोणतीही नैसर्गिक आपत्ती असो झालेल्या नुकसानीबद्दल राज्य सरकरच्या तिजोरीतून मदत करण्याचे काम आमच्या सरकारने केले आहे.'' उलट कोरोना संकटाच्या काळात खतांची दरवाढ करून शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचे काम कोणी केले, असा प्रश्न उपस्थित करून मंत्री देसाई म्हणाले, ""केंद्रातील भाजप सरकारने (Bjp Government) खतांची दरवाढ केली. त्याच पक्षाचे खोत राज्य सरकारवर टीका करत आहेत. त्यांनी समोरासमोर यावे. महाविकास आघाडी सरकारने आतापर्यंत शेतकऱ्यांना किती मदत केली आणि तुमच्या काळात शेतकऱ्यांना किती मदत झाली, याची समोरासमोर येऊन चर्चा करण्यास मी तयार आहे.''

Minister Shambhuraj Desai Criticism Of Sadabhau Khot Satara Political News

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()