'सोमय्यांसारखा माणूस ऊठसूट आरोप करतो, त्यात कोणतंही तथ्य नाही'

Shambhuraj Desai vs Kirit Somaiya
Shambhuraj Desai vs Kirit Somaiyaesakal
Updated on
Summary

'एवढं चांगलं काम झालं असताना सोमय्यांसारखा माणूस ऊठसूट आरोप करतो.'

कऱ्हाड (सातारा) : भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या हे दररोज दिवसातून चार वेळा वेगवेगळे आरोप करतात. त्यांच्या आरोपांना किती महत्त्‍व द्यायचं, हे माध्यमांनी ठरवलं पाहिजे. कोविडमध्ये महाविकास आघाडी सरकारनं चांगलं काम केलं आहे. त्याची दखल जागतिक आरोग्य संघटना (World Health Organization), सर्वोच्च न्यायालयानं (Supreme Court) घेतली आहे. एवढं चांगलं काम झालं असताना सोमय्यांसारखा माणूस ऊठसूट आरोप करतो. त्या आरोपांत कोणतंही तथ्य नाही. कोविडमधील निर्णय सरकारी आदेशानुसारच पारदर्शकपणे झालेले आहेत. सोमय्यांना कुठे तक्रार करायची आहे, तेथे जाऊन करूद्यात, अशा स्पष्ट शब्दात गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर टीका केली. ते कऱ्हाडात बोलत होते.

भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावरही गृहराज्यमंत्री देसाई यांनी निशाणा साधला. ते म्हणाले, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Uddhav thackeray) यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi government) दोन वर्षांपासून पाडण्याचे अनेक मुहूर्त भाजपकडून (BJP) काढण्यात आले. आता पुन्हा नवा मुहूर्त काढला असून दहा मार्चनंतर ठाकरे सरकार पडेल, असे भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) सांगत आहेत. भाजपने आता सरकार पडण्याचा मुहूर्त काढणारा नेताच बदलावा, असा टोला देसाईंनी चंद्रकांतदादांना लगावला.

Shambhuraj Desai vs Kirit Somaiya
नवा भारत 'शरियत'नुसार नव्हे, तर संविधानानुसार चालेल : CM योगी

आघाडी सरकार स्थापनेपासून सरकार पडेल, असे दोन वर्षांत भाजपने अनेक मुहूर्त काढले. मात्र, सरकार इंचभरही हलेलं नाही आणि येथून पुढेही हलणार नाही. आता पुन्हा नवा मुहूर्त काढला असून दहा मार्चनंतर ठाकरे सरकार पडेल, असे चंद्रकांत पाटील सांगत आहेत. ग्रामीण भागात लोक ज्योतिषी, भविष्यकाराकडे काही चांगले मुहूर्त बघायला जातात. पहिल्यांदा, दुसऱ्यांचा त्या ज्योतिषी, भविष्यकाराकडे जाऊन मुहूर्त काढलेला योग्य नसला की तो बदलतात. भाजपने आता सरकार पाडण्याचा मुहूर्त काढणारा नेताच बदलावा, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()