शिरवळ : कोरोना आटोक्यात आणण्यासाठी जिल्हाबंदीची कडक अंमलबजावणी करा, असा आदेश गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी शिंदेवाडी चेकनाक्यावरील पोलिसांना दिला.
श्री. देसाई यांनी या चेकनाक्याला भेट देऊन पाहणी केली. या वेळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार मकरंद पाटील, फलटणचे उपअधीक्षक तानाजी बरडे व शिरवळचे पोलिस निरीक्षक उमेश हजारे उपस्थित होते. राज्यमंत्री देसाई म्हणाले,"" संपूर्ण राज्यात जिल्हा वाहतुकीची बंदी लागू करण्यात आल्याने वैद्यकीय किंवा अत्यावश्यक कारणाशिवाय जिल्ह्याची हद्द सोडता येणार नाही. फारच गरज असेल तर परवानगी घेऊन प्रवास करावा.
पोलिस दलाचे अधिकारी, कर्मचारी रस्त्यावर उभे आहेत. जनतेनेही त्यांना सहकार्याची भूमिका ठेवावी. पोलिसांच्या प्रकृतीची काळजी शासन घेत आहे. जनतेनेही स्वत:ची, त्यांच्या कुटुंबाची व पोलिसांची काळजी घेतली पाहिजे, असेही त्यांनी आवाहन केले. पुणे जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांना चेकनाक्यावरून फोन लावत पुणे हद्दीवरील चेकनाक्याचीही माहिती देसाई यांनी घेतली. याप्रसंगी शिंदेवाडी नाक्यावर केलेल्या उपाययोजनांची माहिती तानाजी बरडे यांनी दिली.
Edited By : Balkrishna Madhale
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.