ढेबेवाडी (सातारा) : वादळाने नुकसान झालेल्या वाड्यावस्त्यातील प्रत्येक नुकसानग्रस्तापर्यंत पोचून दोन दिवसांत पंचनामे सादर करा. त्यामध्ये अजिबात दिरंगाई करू नका, अशा स्पष्ट सूचना गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (Minister Shambhuraj Desai) यांनी आज संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. (Minister Shambhuraj Desai Inspected The Crop Damage Caused By Rain Satara News)
विभागात वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची मंत्री देसाई यांनी आज पाहणी केली. त्यानंतर येथील पोलिस ठाण्यात आयोजित आढावा बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांशी संवाद साधला. प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, तहसीलदार योगेश्वर टोंपे, गटविकास अधिकारी मीना साळुंखे यांच्यासह महसूल, वीज, पाणीपुरवठा, कृषी आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते. वादळी पावसामुळे ढेबेवाडी विभागातील निगडे, शिबेवाडी (गुढे), अंबवडे खुर्द, चाळकेवाडी, मंद्रुळकोळे आदी ठिकाणी नुकसानीच्या घटना घडल्या आहेत.
यातील काही ठिकाणी मंत्री देसाई यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. विभागातील एकूण नुकसानीचा बैठकीत आढावा घेतला. ते म्हणाले, ""पावसाळा तोंडावर आहे. उद्ध्वस्त निवारे तातडीने पुन्हा उभे राहण्याच्या दृष्टीने नियोजन करा. कुणीही नुकसानग्रस्त पंचनाम्यापासून वंचित राहता कामा नये. वाड्यावस्त्यांवर पोचून माहिती घेऊन दोन दिवसांत पंचनाम्यांचे काम संपवा. वादळामुळे खंडित झालेला वीजपुरवठा तातडीने पूर्ववत करा.''
Tauktae Cyclone : अंबवडेत वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस; नुकसान होऊनही पंचनामे नाहीत!
Minister Shambhuraj Desai Inspected The Crop Damage Caused By Rain Satara News
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.