गुळाची ढेप काकांकडून कधी मिळालीच नाही

सहकाराला विलासकाकांनी शिस्त लावली : शंभूराज देसाई
Shambhuraj Desai
Shambhuraj Desaiesakal
Updated on

कऱ्हाड (सातारा) : सहकाराला शिस्त लावण्याचे, तसेच त्यामध्ये पारदर्शकता आणण्याचे काम माजी मंत्री विलासकाका पाटील (Vilaskaka Patil) यांनी सहकार मंत्री असताना केले. त्यांच्यामुळे सहकाराचा पाया भक्कम झाला आहे. सातारा जिल्हा बॅंकेलाही शिस्त लावून त्यांनी जिल्हा बॅंक देशात नावारुपास आणली, असे प्रतिपादन गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (Minister Shambhuraj Desai) यांनी आज येथे केले.

Summary

काकांच्या पश्चात त्यांचे पुत्र उदयसिंह पाटील संघर्षातून वाट काढत पृथ्वीराज चव्हाणांच्या मार्गदर्शनाखाली चालले आहेत.

कऱ्हाड तालुका खरेदी विक्री संघाच्या वतीने इफको कंपनीच्या द्रवरुप खताचे लॉन्चींग गृहराज्यमंत्री देसाई, माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण (MLA Prithviraj Chavan), राष्ट्रवादी काँग्रेसच्या आयटी सेलचे अध्यक्ष सारंग पाटील, रयत कारखान्याचे अध्यक्ष अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांच्या हस्ते झाले. यावेळी संघाचे अध्यक्ष रंगराव थोरात, कोयना दूध संघाचे अध्यक्ष वसंतराव जगदाळे, बाजार समितीचे सभापती महादेव देसाई, कोयना बॅंकेचे अध्यक्ष रोहित पाटील, इफकोचे आरजीबी संचालक हणमंतराव चव्हाण, इफकोचे राज्य प्रबंधक यु. आर. तिजारी, व्यवस्थापक डॉ. आर. एस. पवार, मलकापूरच्या नगराध्यक्षा नीलम येडगे, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, प्रा. धनाजी काटकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. मंत्री देसाई म्हणाले, शेतकऱ्यांना चांगल्या पध्दतीने उसाला दर मिळावा यासाठी सहकारातील साखेचे धोरण उंडाळकर सहकारमंत्री असताना त्यांनी आणले. सातारा जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे शिखर आपण बघत आहोत, त्याचा पाया किसनवीर आबा, रंगराव पाटील, लोकनेते बाळासाहेब पाटील यांच्याबरोबरीने विलासकाकांनी घातला. मुदतीमध्ये कर्ज फेडणाऱ्यास एक टक्के व्याजाने कर्ज देणारी सातारा जिल्हा बॅंक ही राज्यातील एकमेव बॅंक आहे. काकांच्या पश्चात त्यांचे पुत्र उदयसिंह पाटील संघर्षातून वाट काढत पृथ्वीराज चव्हाणांच्या मार्गदर्शनाखाली चालले आहेत. त्यांना पाठबळ देण्याचे काम आम्ही करु. त्यांनीही सहकारी संस्थांची कांकांनी घालून दिलेली शिस्त कायम ठेवून संस्था चांगल्या चालवाव्या.

Shambhuraj Desai
'मोदींचा इस्राईल दौरा' हा देशावरील सायबर हल्ला

आमदार चव्हाण म्हणाले, इफकोने जगात पहिल्यांदा हे द्रवरुप खत तयार केले आहे. त्याचा शेतकऱ्यांना फायदा होईल. सहकारी बॅंकाबाबत रिझर्व्ह बॅंकेचे मत चांगले नव्हते. एखादी चुकीची घटना घडली की त्यावर अंकुश येतात. त्यामुळे रिझर्व्ह बॅंकेने सहकारी बॅंकावर कडक निर्बंध लावले आहेत. त्यामुळे सहकारी बॅंका बंद पडल्या तर मोठ्या खासगी बॅंका, परदेशी बॅंकाचे आक्रमण होईल. त्यामुळे सहकार शिस्त ही महत्वाची आहे. विलासकाकांनी सहकारातील संस्थांना चांगली शिस्त लावली. त्यांच्यानंतर त्याची जबाबदारी उदयसिंह पाटील यांच्यावर आली आहे. काँग्रेस पक्षाने त्यांच्यावर राज्यावर काम करण्यासाठी सरचिटणीसपदी निवड करुन नवी जबाबदारी दिली आहे. राज्यात येणाऱ्या निवडणुकांना आम्ही सामोरे जाणार आहोत. त्यांचे उज्वल भविष्य आहे. त्यांना माझा, शंभूराज देसाईंचा पाठिंबा असेल. त्यांनी सहकारी संस्था चांगल्या चालवून शेतकऱ्यांना जास्तीत-जास्त मदत करावी. अॅड. उदयसिंह पाटील, सारंग पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. संदीप रोकडे यांनी आभार मानले.

Shambhuraj Desai
अफगाण बाॅर्डरवर दहशतवाद्यांचा गोळीबार; पाकिस्तानचे दोन सैनिक ठार

गुळाच्या ढेपेची आठवण

माजी मंत्री विलासकाका पाटील यांच्याकडे कोणीही मंत्री, खासदार, आमदार आले की ते त्यांना गुळाची ढेप, शाल, श्रीफळ देवून त्यांचा सत्कार करत असत. मला गुळाची ढेप काकांकडून कधी मिळाली नाही, असे सांगूण गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी काकांच्या गुळाच्या ढेपेची आज आठवण झाली. त्यांच्या या ढेपेची विधानभवनात, मंत्रालायतही चर्चा व्हायची, असेही त्यांनी नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.