राजकारण तापलं! पराभवाचा गृहराज्यमंत्री नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीचा बदला घेणार?

Shambhuraj Desai
Shambhuraj Desaiesakal
Updated on
Summary

जेवणावळीसाठी रात्री ढाब्यावर युवकांची संख्या वाढली असून बैठका, गाठीभेटींचा सिलसिला सुरू आहे.

पाटण (सातारा) : डिसेंबर महिन्यात येथील नगरपंचायतीची निवडणूक (Nagar Panchayat Election) होत आहे. त्याचा कार्यक्रम जाहीर झाल्याने भावी मेहेरबानांनी बैठका, जेवणावळी व गाठीभेटींचा सपाटा लावला आहे. देसाई-पाटणकर अशी पारंपरिक लढत या निवडणुकीत पाहायला मिळणार आहे. मागील निवडणुकीप्रमाणे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) हे मोजक्या जागा लढविणार की संपूर्ण पॅनेल उभे करणार, तर सत्ताधारी पाटणकर गटांतर्गत मैत्रीपूर्ण लढतीचा पाच वर्षांपूर्वीचा पॅटर्न राबविणार की १७ उमेदवारांचे स्वतंत्र पॅनेल जाहीर करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

पाटण ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीत झाल्यानंतरची ही दुसरी निवडणूक आहे. सातारा जिल्हा बँक निवडणुकीनंतर (Satara District Bank Election) नगरपंचायतीच्या निमित्ताने पुन्हा देसाई-पाटणकर असा जंगी सामना ऐन थंडीत पाहावयास मिळणार आहे. जिल्हा बँकेच्या पराभवाचा वचपा काढण्याची संधी मंत्री देसाईंना या निवडणुकीमुळे मिळाली असून, सत्यजितसिंह पाटणकर (Satyajitsingh Patankar) हे जिल्हा बँकेच्या विजयामुळे चार्ज झालेल्या कार्यकर्त्यांच्या संधीतून १७-० असा पुन्हा मंत्री देसाईंना झटका देणार का? याबाबत उत्सुकता वाढली आहे. एक डिसेंबरपासून अर्ज भरण्यास सुरुवात होणार असल्याने एका-एका प्रभागात दहा ते १२ इच्छुकांची संख्या मतदारांना आकर्षित करू लागली आहे. त्यामुळे जेवणावळीसाठी रात्री ढाब्यावर युवकांची संख्या वाढली असून, बैठका, गाठीभेटींचा सिलसिला सुरू आहे. जिल्हा बँक निवडणुकीतील पराभवावरून मंत्री देसाई यांना सत्यजितसिंह पाटणकर यांनी डिवचले आहे. आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. त्यामुळे मागील निवडणुकीत काही प्रभागात उमेदवार उभे करून दोन प्रभागांत विजय संपादन केलेला देसाई गट यावेळी सर्व जागांवर उमेदवार उभे करून प्रखर विरोध करणार, असे चित्र दिसत आहे.

Shambhuraj Desai
नगरपंचायतीसाठी NCP आमदार शिंदे विरुद्ध सेनेच्या महेश शिंदे गटांत सामना?

सत्ताधारी पाटणकर गटाने मागील निवडणुकीत गटांतर्गत मैत्रीपूर्ण लढतीचा जुगार खेळला होता. मात्र, यावेळी पाटणकर तोच पॅटर्न राबविणार की, प्रत्येक प्रभागात एक उमेदवार देताना इतर इच्छुकांना शांत बसविणार, यावर संपूर्ण निवडणुकीचे चित्र अवलंबून असणार आहे. जिल्हा बँकेमुळे निर्माण झालेल्या वातावरणाचा लाभ उठवताना कार्यकर्त्यांना जुन्या-नव्यांचा मेळ घालणार, की संपूर्ण उमेदवार नवीन देणार, याबाबत पाटणकरांची भूमिका महत्त्‍वाची राहणार आहे. माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, सत्यजितसिंह पाटणकरांना कोणता सल्ला देतात किंवा निर्णय प्रक्रियेत कोणती भूमिका बजावतात, हे महत्त्‍वाचे आहे. मैत्रीपूर्ण लढतीला खो दिला आणि १७ उमेदवारांचे पॅनेल जाहीर केले तर नाराजांची नाराजी विक्रमसिंह पाटणकर कसे काढतात, यावर १७-० चा विजय अपेक्षित आहे. मागील निवडणुकीत मंत्री देसाईंना दोन व भाजपने एका जागेवर विजय संपादन केला होता. यावेळी मंत्री शंभूराज देसाई नगरपंचायतीवर सत्ता स्थापनेसाठी तर सत्यजितसिंह पाटणकर विरोधकांना संपूर्ण सत्तेसाठी व्यूहरचना करतील, अशी शक्यता आहे. दुरंगी लढत झाली नाही तर मात्र पाटणकरांना अंतर्गत वादाचा फटका बसू शकतो.

Shambhuraj Desai
NCP आमदाराचा पराभव करणाऱ्या रांजणेंचा BJP प्रदेशाध्यक्षांकडून 'सत्कार'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()