पाटण तालुक्यातील दौलतनगरला मिळणार Ventilator Bed; गृहराज्यमंत्र्यांची माहिती

ढेबेवाडीत कोरोना उपचार केंद्रामध्ये 36 ऑक्सिजन बेड कार्यान्वित आहेत.
Minister Shambhuraj Desai
Minister Shambhuraj Desaiesakal
Updated on

मोरगिरी (सातारा) : पाटण तालुक्यातील रुग्णांच्या सोयीसाठी (कै) शिवाजीराव देसाई चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आठ व्हेंटिलेटर बेड (Ventilator Bed) दौलतनगर येथील कोविड सेंटरमध्ये लवकरच सुरु करण्यात येत आहेत. त्यामुळे रुग्णांची चांगली सोय होईल, अशी माहिती गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (Minister Shambhuraj Desai) यांनी आज 'ई-सकाळ'शी बोलताना दिली. पाटणच्या कोविड सेंटरमधील (Covid Center) आणखी 50 ऑक्सिजन बेडसाठीही निधी मंजूर करून दिल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. (Minister Shambhuraj Desai Will Provide Eight Ventilator Beds To Daulatnagar Satara News)

पाटण तालुक्यात एकही व्हेंटिलेटर बेड नसल्याबतच्या प्रश्नावत मंत्री देसाई बोलत होते. मंत्री देसाई म्हणाले, पाटण तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांना उपचाराकरिता ऑक्सिजन बेडची कमतरता भासू नये, याकरिता दौलतनगर कोरोना उपचार केंद्रामध्ये 50 ऑक्सिजन बेड कार्यान्वित आहेत. वाढीव 25 ऑक्सिजन बेडचे काम पूर्ण झाले आहे. (कै) शिवाजीराव देसाई चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आठ व्हेंटिलेटर बेडचीही उभारणी सुरु असून लवकरच तेही सुरु होतील. पाटणच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर कोविड केअर सेंटरमध्ये 50 ऑक्सिजन बेड कार्यान्वित आहेत. तेथे आणखी 50 ऑक्सिजन बेड सुरु करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन दिला आहे. त्याचे काम सुरू असून ते लवकरच पूर्ण होणार आहे.

ढेबेवाडी येथील कोरोना उपचार केंद्रामध्ये 36 ऑक्सिजन बेड कार्यान्वित आहेत. दौलतनगर व पाटण येथील सेंटरमध्ये प्रत्येकी दोन-दोन ड्युरा ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. याचे कामही सुरु करण्यात आले आहेत. या तिन्ही उपचार केंद्राकरिता अतिरिक्त डॉक्टर, नर्से व स्टाफ आवश्यक आहे. त्याच्या उपलब्धतेसाठी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. औषधे उपलब्धतेच्या सूचना जिल्हा शल्यचिकित्सकांना दिल्या आहेत. त्यामुळे कोरोना बाधित रुग्णांची गैरसोय पाटण तालुक्यात होणार नाही.

बाजारपेठेत गर्दी उसळताच पोलिसांनी भाजीपाला भरला टेंपोत; शेतकऱ्यांत नाराजी

Minister Shambhuraj Desai Will Provide Eight Ventilator Beds To Daulatnagar Satara News

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()