'लाडकी बहीण योजने'बाबत शरद पवारांनी व्यक्त केली शंका; कामगारमंत्री म्हणाले, 'हे विरोधक भुरटे आहेत..'

Ladki Bahin Yojana : पहिल्यांदा महिलांना तीन-तीन हजार रुपये दिले आहेत. अजूनही देणार आहोत, ही योजना बंद होणार नाही.
Ladki Bahin Yojana Suresh Khade
Ladki Bahin Yojana Suresh Khadeesakal
Updated on
Summary

या योजनेबद्दलचे अजित पवारांचे बॅनर सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी लावले, ते अजित पवारांनी लावले नाहीत. ही योजना महायुतीचीच आहे.

कऱ्हाड : लाडक्या बहिणीवरून (ladaki Bahin Yojana) महायुतीत कोणताही वाद नाही. या योजनेबद्दलचे अजित पवारांचे बॅनर सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी लावले, ते अजित पवारांनी लावले नाहीत. ही योजना महायुतीचीच आहे. त्याला मुख्यमंत्र्यांचे नाव दिले गेले, अजित पवार यांनी त्याला अर्थसाहाय्य केले आणि देवेंद्र फडणवीस यांच्या डोक्यातून ही योजना बाहेर पडली आहे. त्यामुळे ही योजना तिघांची म्हणजेच महायुतीचीच असून, ती जनतेसाठीच आहे, असे स्पष्टीकरण कामगारमंत्री डॉ. सुरेश खाडे (Suresh Khade) यांनी पत्रकारांशी बोलताना दिले.

Ladki Bahin Yojana Suresh Khade
मुस्लिमांबाबत उच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांचं वादग्रस्त विधान; Supreme Court कडून स्वेच्छेने खटला दाखल, असं काय म्हटलं होतं?

भाजप कामगार मोर्चा (BJP Labor Morcha) कऱ्हाड दक्षिणच्या वतीने शिंदेवाडी- विंग येथील बांधकाम कामगार संमेलनानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य अतुल भोसले, भरत पाटील व मान्यवर उपस्थित होते.

Ladki Bahin Yojana Suresh Khade
'मनोज जरांगे यांच्या उपोषणाची दखल घ्या, अन्यथा राज्यभर उद्रेक होईल'; मराठा समाज, संभाजी ब्रिगेडचा सरकारला इशारा

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी लाडकी बहीण योजनेबद्दल व्यक्त केलेल्या शंकेबाबत मंत्री खाडे म्हणाले, ‘‘ही योजना बंद होणार नाही. पहिल्यांदा महिलांना तीन-तीन हजार रुपये दिले आहेत. अजूनही देणार आहोत, ही योजना बंद होणार नाही. विरोधकांना बोलायला काय जाते? काहीतरी बोलून फुसका बार काढायचा, लोकांमध्ये गैरसमज निर्माण करायचा, असे सुरू असते. हे विरोधक भुरटे आहेत. जनतेने यांच्यावर विश्वास ठेवू नये, अशी माझी विनंती आहे.’’

कऱ्हाडला उद्योग आणण्यासाठी प्रयत्नशील

कऱ्हाडला जर सर्व सुविधा मिळत असतील, एमआयडीसी असेल, तर उद्योग आणण्यासाठी मी अतुल भोसले यांच्या माध्यमातून निश्‍चित प्रयत्न करेन, असे आश्‍वासनही मंत्री खाडे यांनी यावेळी दिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.