भूस्खलनातील बाधित कुटुंबीयांना दहा हजारांची मदत : मंत्री वडेट्टीवार

Minister Vijay Wadettiwar
Minister Vijay Wadettiwaresakal
Updated on

कोयनानगर (सातारा) : भूस्खलनाच्या (Patan Taluka Landslide) बाधित कुटुंबीयांना तातडीची दहा हजार रुपयांची मदत देण्यात येणार असल्याची घोषणा मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार (Minister Vijay Wadettiwar) यांनी नुकतीच येथे केली. दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पुनर्वसितांचे पुन्हा चांगल्या जागेची पाहणी करून वर्षभरात पुनर्वसन केले जाईल, अशीही ग्वाही मंत्री वडेट्टीवार यांनी दिली. (Minister Vijay Wadettiwar Pledges To Provide Ten Thousand Rupees To The Families Affected By Landslide bam92)

Summary

गेल्या ४०-५० वर्षांतील सर्वांत मोठ्या पावसाने भूस्खलन, दरडी कोसळण्याचा दुर्घटना घडल्या आहेत.

कोयनानगर येथे मदत व पुनर्वसनमंत्री वडेट्टीवार यांनी भेट देऊन अधिकाऱ्यांशी आढावा बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मंत्री वडेट्टीवार म्हणाले,‘‘ गेल्या ४०-५० वर्षांतील सर्वांत मोठ्या पावसाने भूस्खलन, दरडी कोसळण्याचा दुर्घटना घडल्या आहेत. त्यात अनेकांचे जीव गेले आहेत. संबंधित बाधित कुटुंबीयांना मदतीची गरज आहे.

Minister Vijay Wadettiwar
Satara Rain: साताऱ्यात अतिवृष्टीने दरड कोसळून ३७ जणांचा मृत्यू

संबंधित दुर्घटनाग्रस्त कुटुंबीयांना प्रत्येकी दहा हजार रुपयांची तातडीची मदत देण्यात येणार आहे. ज्यांचा मृत्यू झाला आहे, त्यांच्या कुटुंबाला पाच लाख देण्यात येतील. जखमी झालेल्यांचे शासनामार्फत मोफत आरोग्य उपचार केले जातील. पुनर्वसनाचे प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. तो प्रश्न वर्षभरात मार्गी लावला जाईल. कोकण, पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात नुकसान आहे. त्यांच्या पुनर्वसनासाठी महिनाभरात मंत्रिमंडळात ठोस निर्णय घेतला जाईल.’’

Minister Vijay Wadettiwar
भूस्खलनाने हादरलेल्या जिल्ह्याला पालकमंत्र्यांचा आधार
Minister Vijay Wadettiwar
Minister Vijay Wadettiwar

खोल्या दुरुस्तीलाही निधी देणार

पुनर्वसन मंत्री वडेट्टीवार यांनी कोयनानगर येथे स्थलांतरितांशी संवाद साधला. मिरगाव, बाजे, गोकुळ येथील बाधितांशी त्यांनी संवाद साधला. कोयना प्रकल्पाच्या ३०० खोल्यांतील १५६ खोल्या नादुरुस्त आहेत. दुरुस्तीसाठी कोयना प्रकल्पाला निधी देऊन त्यांचे स्थलांतर येथे करणार आहे. पावसाचे प्रमाण कमी झाल्यावर लोकांनी पसंत केलेल्या जमिनीवर त्यांचे पुनर्वसन करणार आहे, असेही वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.

Minister Vijay Wadettiwar Pledges To Provide Ten Thousand Rupees To The Families Affected By Landslide bam92

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.