'शिवरायांच्या मावळ्यांसारखे दबावाला न घाबरता भ्रष्ट सत्ताधाऱ्यांचा पराभव करा'

Minister Dr. Vishwajeet Kadam
Minister Dr. Vishwajeet Kadamesakal
Updated on

कामेरी (सातारा) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) मावळ्यांसारखे कुणाच्याही दबावाला न घाबरता बाहेर पडा व भ्रष्ट सत्ताधाऱ्यांचा पराभव करून यशवंतराव मोहिते रयत पॅनेलला (Yashwantrao Mohite Rayat Panel) विजयी करा, असे आवाहन सहकार राज्‍यमंत्री डॉ. विश्वजित कदम (Minister Dr. Vishwajeet Kadam) यांनी केले. यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या (Yashwantrao Mohite Krishna Co-operative Sugar Factory Election) येथील प्रचारसभेमध्ये ते बोलत होते. रयत पॅनेलचे गट नंबर चारचे उमेदवार प्रा. अनिल भीमराव पाटील यांनी प्रास्ताविक केले. (Minister Vishwajeet Kadam Appeal To The People To Defeat The Opposition In The Krishna Factory Election)

Summary

लोकनेते राजारामबापू पाटील आणि यशवंतराव मोहिते यांनी चालू केलेली सहकाराची चळवळ टिकवायची असेल, तर रयत पॅनेलला भरघोस मतांनी मतदान करून विजयी करा.

यावेळी गट नंबर चारमधील उमेदवार विवेकानंद मोरे, विश्वासराव मोरे-पाटील, आनंदराव मलगुंडे, सत्वशीला थोरात या उपस्थित होत्‍या. डॉ. विश्वजित कदम व डॉ. जितेश कदम तसेच उमेदवार व सभासद यांच्या हस्ते ग्रामदैवत भैरवनाथास श्रीफळ वाढवून प्रचाराचा प्रारंभ करण्यात आला. कोण कोणाला कामावरून कमी करण्याची वल्गना करत असेल तर त्याची संपूर्ण जबाबदारी घ्यायला आम्ही खंबीर आहोत. गेल्या पाच वर्षांमध्ये एकाही मृत सभासदाच्या वारसांना वारसाहक्काने सभासदत्व मंजूर केले नाही. लोकनेते राजारामबापू पाटील आणि यशवंतराव मोहिते (Rajarambapu Patil and Yashwantrao Mohite) यांनी चालू केलेली सहकाराची चळवळ टिकवायची असेल तर रयत पॅनेलला भरघोस मतांनी मतदान (Voting) करून विजयी करा आणि सहकार टिकवून ठेवा, असे आवाहनही डॉ. कदम यांनी केले.

Minister Dr. Vishwajeet Kadam
'आंबेडकरांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला; मराठ्यांसाठी खासदारांनी राजीनामा द्यावा'

रघुनाथ हळदे-पाटील यांनी रयत पॅनेलला पाठिंबा दिल्याचे पत्र डॉ. कदम यांच्याकडे दिले. ज्‍येष्ठ अभिनेते विलास रकटे, अॅड. देवानंद मोरे यांची भाषणे झाली. यावेळी विजय पाटील, शब्बीर मुल्ला, शिवाजी पाटील, सरपंच स्वप्नाली जाधव, पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रवादी महिला आघाडीच्या सरचिटणीस छाया पाटील, माजी संचालक हनुमंतराव पाटील शिरटेकर, माजी उपसरपंच तानाजी माने, कृष्णा माळी, विलास बारपटे उपस्थित होते. हंबीरराव जडगे यांनी सूत्रसंचालन केले. वैभव पाटील यांनी आभार मानले.

Minister Vishwajeet Kadam Appeal To The People To Defeat The Opposition In The Krishna Factory Election

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()