रिक्षातून उडी मारल्याने तेथे लोक जमले. त्वरित पोलिसही तेथे पोचले. रिक्षासह चालकालाही ताब्यात घेण्यात आले.
कऱ्हाड : रिक्षातून प्रवास करणाऱ्या अल्पवयीन मुलीला (Minor Girl) ज्या थांब्यावर उतरायचे होते, तेथे रिक्षा न थांबवता चालकाने ती तशीच पुढे नेली, त्याचवेळी तिच्याकडे पाहून अश्लील हावभाव केल्याने घाबरलेल्या मुलीने रिक्षातून उडी मारून सुटका करून घेतली. विद्यानगर परिसरात (Vidyanagar Karad) काल सायंकाळी ही घटना घडली.