''लाडकी बहीण योजनेसाठी पैसे द्यायचे आणि दुसरीकडे महागाई व गॅस, खते-बी बियाणे यांची दरवाढ करायची, अशी सरकारची मतलबी भूमिका आहे.''
वाई शहर : लाडकी बहीण योजनेसाठी प्रशासनाला हाताशी धरून, आपलेच कररूपातील पैसे वाटून निवडणुकीत सहकार्य करा, असे धमकावले जात आहे. कोरेगाव व विदर्भातील आमदार असे धमकावून मते मागत असल्याचा आरोप माजी मंत्री आमदार बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil) यांनी केला.