Maratha Reservation : 'राणा भीमदेवी थाटात भुजबळ मराठा आरक्षणाला विरोध करताहेत, भाजप तर त्यांना धमकावत नाही?'

दोन्ही समाजाने संयम राखावा. आपली डोकी थंड ठेवून आपला हक्क शांततेत मिळवावा.
Chhagan Bhujbal Bhaskar Jadhav
Chhagan Bhujbal Bhaskar Jadhavesakal
Updated on
Summary

भुजबळांना कोणीतरी जातीय दंगली घडविण्यासाठी उचकवत आहे काय? हे विचारण्याची वेळ आली आहे.

कोरेगाव : भारतीय जनता पक्षाचा एखादा वरिष्ठ नेता, राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठामंत्री, ओबीसी नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना तुम्ही जामिनावर बाहेर आहात, याची जाणीव करून देत, दोन्ही समाजात जातीय दंगली घडतील अशी वक्तव्ये करा अथवा वर्तन करण्‍याची धमकी तर देत नसेल ना? असा संशय शिवसेनेचे (उबाठा) आमदार भास्करराव जाधव (Bhaskar Jadhav) यांनी येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

जालना येथे काल झालेल्या ओबीसी- भटके विमुक्त आरक्षण बचाव एल्गार सभेत श्री. भुजबळ यांनी मोठा आवेश आणि जोशात मराठा समाजाच्या आरक्षणाला (Maratha Reservation) विरोध करत आव्हानात्मक भाषेत केलेली टीका लक्षात घेतली, तर त्यांना कोणीतरी जातीय दंगली घडविण्यासाठी उचकवत आहे काय? हे विचारण्याची वेळ आली आहे, असेही श्री. जाधव म्हणाले.

Chhagan Bhujbal Bhaskar Jadhav
Maratha Reservation : मनोज जरांगेंच्या पाठीमागे राजकीय शक्ती उभी; OBC नेते प्रकाश शेंडगेंचा गंभीर आरोप

मंत्री असताना मंत्रिमंडळात तुम्ही मराठा आरक्षणाला विरोध करत नाही. मात्र, बाहेर आल्यानंतर अगदी राणा भीमदेवी थाटामध्ये आरक्षणाला विरोध करत आव्हान देत आहात, याचाच अर्थ त्यांचा बोलविता धनी कोणीतरी अन्य असावा हे नक्की. मात्र, दोन्ही समाजाने संयम राखावा. आपली डोकी थंड ठेवून आपला हक्क शांततेत मिळवावा, असे श्री. जाधव म्हणाले.

Chhagan Bhujbal Bhaskar Jadhav
Maratha Reservation : माझ्या जातीच्या आड कोणी आलं, तर मी त्याला सोडणार नाही; जरांगेंचा भुजबळांना थेट इशारा

स्वतःच्या विधानसभा मतदारसंघातील एक पूर्ण झालेला पूल ज्याचे स्ट्रक्चरल ऑडिट, रंगरंगोटी झालेली आहे. तो आदित्य ठाकरे यांनी बॅरिकेट बाजूला करून जनतेसाठी खुला केला यात गुन्हा काय आहे? तरी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला असून, त्याचा आम्ही निषेध करत आहोत. मात्र, हा गुन्हा म्हणजे लढवय्या नेत्यांसाठी स्टार असतो, तसा तो आदित्य ठाकरे यांच्‍यासाठीही ठरेल असे जाधव यांनी नमूद केले.

राणे विस्‍मृतीत गेलेले नेते

नारायण राणे हे विस्मृतीत गेलेले नेते आहेत. मागील आठ ते नऊ वर्षांत त्यांची ५०० लोकांची सभा आपण कोठे झाल्याचे ऐकलेले आहे का? उद्धव ठाकरे जे बोलतील त्यावर टीका करत, मै भी हू एवढंच दाखवण्याचा ते सतत प्रयत्न करत असतात. त्यांची दोन्ही पोरं म्हणजे महाराष्ट्राला लागलेला एक कलंक आहे, असेही श्री. जाधव म्हणाले.

Chhagan Bhujbal Bhaskar Jadhav
Maratha Reservation : दुसरीकडून कुठूनही नाही, आता मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण घेणार; साताऱ्यात जरांगे-पाटलांचा निर्धार

आमदार अपात्र ठरवण्यासाठी किती वेळ घ्यावा, यासाठी अखेर सर्वोच्च न्यायालयानेच विधानसभा अध्यक्षांना कालमर्यादा घालून दिली, तरीही अध्यक्ष निर्णय घेत नाहीत. ते केंद्र आणि राज्य सरकारला अभिप्रेत काम करत आहेत. त्यामुळे त्यांनी अध्यक्षपदाचा घटनात्मक दर्जाच घालवला आहे. देशातील घटना, संविधान, लोकशाही संपुष्टात आणण्याचे काम भाजप करत आहे. ते हाणून पाडण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे.

-भास्‍करराव जाधव, आमदार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()