राष्ट्रीय पातळीवर चुकीचे निर्णय घेतले गेल्याने त्याची झळ सर्वसामान्यांना बसली आहे.
उंब्रज : ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chavan) यांच्या विचारांचा कऱ्हाड उत्तर विधानसभा मतदारसंघ (Karad North Assembly constituency) आहे. त्यांनी याच मतदारसंघाचे राज्य व देशाचे नेतृत्व केले. त्यामुळे मतदारसंघाला ऐतिहासिक वारसा आहे. हा वारसा समर्थपणे पुढे चालवण्यासाठीच काँग्रेस पक्ष (Congress Party) बळकट करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण (MLA Prithviraj Chavan) यांनी केले.
कऱ्हाड उत्तर काँग्रेस कमिटीच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तिपत्रे आमदार चव्हाण, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस उदयसिंह पाटील, जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेशराव जाधव यांच्या हस्ते देण्यात आली. त्याप्रसंगी ते बोलत होते. प्रदेश प्रतिनिधी अजित पाटील-चिखलीकर, कऱ्हाड उत्तरचे अध्यक्ष हेमंतराव जाधव, कऱ्हाड दक्षिणचे अध्यक्ष मनोहर शिंदे, सज्जन यादव, धैर्यशील सुपले, अमित जाधव, भीमराव डांगे, उमेश साळुंखे, यशवंत चव्हाण, जयसिंग खराडे, सुरेशराव घोलप, उमेश मोहिते, इंद्रजित जाधव, संजयराव साळुंखे, प्रतापराव देशमुख, प्रदीप निकम, प्रतापराव चव्हाण, चंद्रकांत साळुंखे, मधुकर जाधव तसेच बहुसंख्येने कऱ्हाड उत्तरमधील काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
आमदार चव्हाण म्हणाले,‘‘महागाईने रौद्ररुप धारण केले आहे. राष्ट्रीय पातळीवर चुकीचे निर्णय घेतले गेल्याने त्याची झळ सर्वसामान्यांना बसली आहे. मोदी सरकारने (Modi Government) आज देश अडचणीत आणला असून, पुन्हा नव्याने सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून काँग्रेस पक्ष बळकट करावा.’’ डॉ. जाधव, हेमंत जाधव, श्री. चिखलीकर, निवासराव थोरात यांनी मनोगत व्यक्त केले. सरचिटणीस धैर्यशील सुपले यांनी सूत्रसंचालन केले. सुदाम दीक्षित यांनी आभार मानले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.