मलकापूर (सातारा) : नेतृत्व अभाव, अहंकार व चुकीच्या धोरणामुळे देशाची अर्थव्यवस्था (Economy in India) ढासळली आहे. कोरोनामुळे (Coronavirus) देशात चार लाख लोक मृत्यूमुखी पडले आहेत. शिक्षणाचा खेळखंडोबा झाला आहे. कोट्यवधी लोकांचा रोजगार गेला आहे. चुकीच्या निवडलेल्या नेतृत्वाची आज देशाला किंमत भोगावी लागत आहे, असा आरोप माजी मुख्यमंत्री व आमदार पृथ्वीराज चव्हाण (MLA Prithviraj Chavan) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्यावर नाव न घेता केला आहे. (MLA Prithviraj Chavan Criticizes Prime Minister Narendra Modi In Malkapur Satara Marathi News)
नेतृत्व अभाव, अहंकार व चुकीच्या धोरणामुळे देशाची अर्थव्यवस्था ढासळली आहे.
(कै) आनंदराव चव्हाण व (कै) प्रेमलाताई चव्हाण यांच्या स्मृती दिनाचे औचित्य साधून पालिकेच्यावतीने प्रेमलाताई चव्हाण कन्या सुरक्षा अभियानाचा (Premalatai Chavan Kanya Suraksha Abhiyan) वर्धापनदिन, विविध कार्यक्रमाप्रसंगी आमदार चव्हाण बोलत होते. आमदार मोहनराव कदम (MLA Mohanrao Kadam), रयत कारखान्याचे अध्यक्ष अॅड. उदयसिंह पाटील, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश जाधव, नगराध्यक्षा नीलम येडगे, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, अजित पाटील-चिखलीकर, प्राचार्य सतीश माने, रणजीत देशमुख, इंद्रजीत चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य शंकरराव खबाले, विद्या थोरवडे, धनाजी काटकर, नरेंद्र पाटील, नामदेव पाटील, वैशाली वाघमारे, उत्तम पाटील, झाकिर पठाण, सतिश माने, राहूल मर्ढेकर आदी उपस्थित होते. श्री. चव्हाण म्हणाले, कोरोना संकटाला सरकारने धाडसाने तोंड दिले आहे. कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरणाशिवाय दुसरा उपाय नाही. इतर राज्यांच्या तुलनेत राज्यात सर्वाधिक लसीकरण झाले आहे. दररोज सरासरी दोन लाख लोकांना लसीकरण केले जाते.
महिन्याला किमान तीन कोटी लस राज्यात उपलब्ध होणे गरजेचे आहे. तसा ठराव विधीमंडळात केला आहे. लसीकरणात दिरंगाई, ढिसाळपणा केल्याचा परिणाम भविष्यात भोगावा लागेल. मलकापूरला मिळालेल्या एक कोटी निधीतुन शहरासाठी चांगला प्रकल्प उभारावा. नागरी सुविधा केंद्र व पोलीस ठाण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मलकापूरमध्ये मनोहर शिंदे यांची चिकाटी,एक हाती सत्ता असल्याने मोठी विकास कामे होत आहेत. चव्हाण दाम्पत्यांने अतिशय खडतर परिस्थितीतही कसल्याही सोयी सुविधा नसताना कॉग्रेसचे विचार जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. ज्ञानदेव साळुंखे यांनी सूत्रसंचालन केले. राजेंद्र यादव यांनी आभार मानले.
पालिका करणार मुलांच्या शिक्षणाचा खर्च
मनोहर शिंदे यांनी 'ना.आनंदराव चव्हाण शिष्यवृत्ती योजना' जाहीर केली. याअंतर्गत मलकापूर कार्यक्षेत्रातील ज्या मुला -मुलींच्या पालकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अशा मुला- मुलींचा प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाचा खर्च पालिकेच्या वतीने करणार असल्याचे सांगितले. येथील नागरिकांच्या सहकार्याने योजना यशस्वी होत असून त्यांना पारितोषिकेही मिळत आहे ही अभिमानाची बाब आहे. सर्वसामान्य नागरिकांचा विकास डोळ्यासमोर ठेवून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कटिबद्ध असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
MLA Prithviraj Chavan Criticizes Prime Minister Narendra Modi In Malkapur Satara Marathi News
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.