कोरेगाव (सातारा) : स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या काळापासून काही ठराविक विचारसरणीचे लोक महाराष्ट्राचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. छत्रपतींच्या गादीला डावलण्याचे काम कोण करत आहे, हे सुद्धा सामान्य जनतेला चांगले माहीत आहे. भारतीय जनता पक्षाने (Bharatiya Janata Party) शब्द दिला होता, तर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये (Union Cabinet Expansion 2021) संधी न देऊन खासदार उदयनराजे भोसले (MP Udayanraje Bhosale) यांचा एकप्रकारे अवमान केला आहे, अशी टीका आमदार शशिकांत शिंदे (MLA Shashikant Shinde) यांनी भाजपवर केली आहे. (MLA Shashikant Shinde Criticizes Modi Government Over Union Cabinet Expansion 2021 Satara Political News)
खासदार शरद पवार यांचे उदयनराजे भोसले यांच्यावर विशेष प्रेम होते. ते आमच्या पक्षाचे खासदार होते.
केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार आणि भाजपची भूमिका याविषयी कोरेगावात आमदार शिंदे म्हणाले, ‘‘खासदार शरद पवार (MP Sharad Pawar) यांचे उदयनराजे भोसले यांच्यावर विशेष प्रेम होते. ते आमच्या पक्षाचे खासदार होते. त्यांच्याबरोबर आम्ही अनेक वर्षे एकत्रितपणे काम केले. त्यांनी मुदतीपूर्व राजीनामा दिला. भाजपने त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये संधी देण्याचा शब्द देऊन राजीनामा द्यायला लावला असल्याची चर्चा साताऱ्यात होती. मी देखील तसे ऐकून होतो. कारण, या निवडणुकीच्या प्रक्रियेत मी होतो. मात्र, नुकत्याच झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये खासदार उदयनराजे भोसले व खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर (MP Ranjitsingh Naik-Nimbalkar) यांना संधी न देऊन पश्चिम महाराष्ट्रावर भाजपने अन्याय केला आहे. या दोघांपैकी एकाला संधी मिळाली असती, तर पश्चिम महाराष्ट्राच्या विकासासाठी ते चांगले झाले असते.
पश्चिम महाराष्ट्रात भाजपची विशेष अशी ताकद नाही. राष्ट्रवादी-काँग्रेससह अन्य मित्रपक्षांचे नेते स्वत:कडे खेचून भाजपने आपली ताकद असल्याचे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे.’’ खासदार उदयनराजे भोसले हे आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असते, तर त्यांच्या शब्दाला राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये (Mahavikas Aghadi Government) वजन असते. राज्य सरकारच्या माध्यमातून त्यांनी निश्चितपणे विकासकामे केली असती. मात्र, भाजपने त्यांचा केवळ राजकीय वापर करून घेतला. त्यांचा योग्य तो सन्मान ठेवला नाही, याचे दु:ख वाटते, असेही आमदार शिंदे यांनी नमूद केले.
MLA Shashikant Shinde Criticizes Modi Government Over Union Cabinet Expansion 2021 Satara Political News
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.