''मराठा आरक्षणाला २८८ आमदारांनी विधानसभेत एकमत दाखवले होते. विधान परिषदेतही सहमती दर्शवली होती.''
सातारा : कोरेगावचे आमदार आणि अमरावतीचे आमदार रवी राणा यांना सत्तेची गुर्मी आणि मस्ती आली आहे. लाडकी बहीण योजना ही त्यांची जहागिरी असल्यासारखे वागत आहेत. मतदान करा अन्यथा डिसेंबरमध्ये तुमचा कार्यक्रम करू, अशा धमक्या देत आहेत. खोट्या केसेस दाखल करत आहेत; पण त्यांच्या अशा धमक्यांना आम्ही घाबरत नाही. शासकीय योजनांच्या माध्यमातून सामान्यांच्या पैशावर दरोडा टाकत असून, याची चौकशी झाली पाहिजे. अधिकाऱ्यांचीही चौकशी करून कारवाई झाली पाहिजे. अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांनी येथे पत्रकार परिषदेत दिला.