निवडणूक जिंकण्याचं कट कारस्थान विरोधकांनी केलं : आमदार शिंदे

Shashikant Shinde
Shashikant Shindeesakal
Updated on
Summary

'निवडणुकीत शशिकांत शिंदे व मी एकमेकांच्या विरोधात लढलो; पण..'

कोरेगाव (सातारा) : खऱ्या मतदारांचा मतदानाचा हक्क हिरावून बोगस नावे मतदार यादीत घालून लोकशाहीला घातक असलेले निवडणूक जिंकण्याचे कट कारस्थान विरोधकांनी केल्याचा आरोप करत आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांनी कोरेगावच्या प्रगतीसाठी सर्वानुमते दिलेल्या नव्या चेहऱ्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Nationalist Congress Party) पॅनेलच्या सर्व उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन केले.

कोरेगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी (Koregaon Nagar Panchayat Election) राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनेलच्या प्रचाराचा प्रारंभ येथील भैरवनाथ मंदिरात श्रीफळ वाढवून झाला. त्या वेळी आमदार शिंदे बोलत होते. याप्रसंगी किशोर बाचल, संजय झंवर, प्रतिभा बर्गे, शहाजीराव बर्गे, विलासराव बर्गे, संजय पिसाळ, किशोर बर्गे, भास्कर कदम, सुरेखा पाटील, संगीता बर्गे, मंदा बर्गे, गजानन बर्गे, संभाजी बर्गे, अनिल क्षीरसागर, चंद्रकांत बर्गे, दीपक मालुसरे आदींसह पॅनेलचे सर्व उमेदवार उपस्थित होते. आमदार शिंदे म्हणाले, ‘‘आपण काहीही करू शकतो, अर्थकारणाच्या माध्यमातून निवडणुकीची समीकरणे बदलू शकतो, असा संदेश देण्याचा प्रयत्न काही लोकांकडून सुरू आहे; परंतु कोरेगाव कोणाची मक्तेदारी नाही, या ठिकाणी हुकूमशाही चालवून घेतली जात नाही. अधिकार गाजवू दिला जात नाही, हे या निवडणुकीत दाखवून देण्याची संधी कोरेगावकरांना मिळाली आहे.

Shashikant Shinde
भाजपसोबत युती करताच कॅप्टनचा काँग्रेसला झटका

गेल्या पंचवार्षिकमध्ये राज्यात आपले सरकार नव्हते, तरीही कोरेगावात प्रशासकीय इमारत, आयटीआय तसेच शहरातील विविध विकासकामांसाठी निधी आणला. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आगामी काळात मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जाईल. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनेलच्या सर्व उमेदवारांना विजयी करून नगरपंचायतीमध्ये काम करण्याची संधी कोरेगावकरांनी द्यावी.’’ किशोर बाचल यांनी विरोधकांवर हल्ला चढवत ‘लोकशाहीतील ही पद्धत आहे का?’ असा प्रश्न उपस्थित केला.

Shashikant Shinde
'त्या' समाजकंटकांना त्वरित शोधून काढा : उदयनराजे

ते म्हणाले, ‘‘गेल्या वेळी नगरपंचायतीच्या निवडणुकीत शशिकांत शिंदे व मी एकमेकांच्या विरोधात लढलो; परंतु त्यानंतर आमच्या दोघांचेही काही नगरसेवक आमच्यातून गेले. त्यामुळे शशिकांत शिंदे यांना काम करण्याची संधी मिळाली नाही. आता त्यांच्या नेतृत्वाखाली कोरेगावचा खऱ्या अर्थाने विकास करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनेलच्या सर्व उमेदवारांना निवडून द्या.’’ या वेळी संजय झंवर, प्रतिभा बर्गे यांची भाषणे झाली. याप्रसंगी सोसायटीच्या निवडणुकीतील विजयाबद्दल गुलाब बर्गे, सोमनाथ बर्गे, पोपट येवले यांचा सत्कार झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.