'महाविकास आघाडी'त अडचण; NCP च्या आमदाराची BJP च्या आमदाराला 'ऑफर'

महाविकास आघाडीत सगळे एकत्र असल्याने थोडी अडचण : आमदार शशिकांत शिंदे
Shashikant Shinde
Shashikant Shindeesakal
Updated on

सातारा : जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गाबाबत प्रचंड त्रुटी आहेत. मुळात साताऱ्याला टोल लागू नये, ही सर्वांची मागणी आहे. या मागणीसाठी सर्वपक्षीय आंदोलन झाल्यास त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (Nationalist Congress Party) निश्चित सहभागी होईल. सर्व सातारकरांच्या एकजुटीचा जनरेटा निर्माण करणाऱ्या आंदोलनाची सध्या गरज आहे. यासाठी शिवेंद्रसिंहराजेंसह (MLA Shivendrasinharaje Bhosale) इतर कोणीही पुढाकार घ्यावा, आम्ही त्या आंदोलनात उतरण्यास तयार आहोत, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षप्रतोद आमदार शशिकांत शिंदे (MLA Shashikant Shinde) यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितले. दरम्यान, जिल्हा बँक राजकारणविरहित राहावी, यासाठी सर्वांशी चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

Summary

महाविकास आघाडीत सगळे एकत्र असल्याने थोडी अडचण होते. पण, सगळे सांभाळून घेऊन वाटचाल करत आहोत.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या रणनीतीविषयी विचारले असता ते म्हणाले, ‘‘जिल्हा बँक ही राजकारणविरहित असावी, या मानसिकतेतून बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याबाबत सर्व नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. सध्या याद्यांचा कार्यक्रम सुरू असून, त्यानंतर महाविकास आघाडीचे नेते एकत्र बसून निर्णय घेतील. महाविकास आघाडीत तीन पक्ष एकत्र आहेत.’’ कोरेगाव मतदारसंघात शिवसेनेचा आमदार असल्याने तुमची अडचण होते का, या प्रश्नावर ते म्हणाले,‘‘ महाविकास आघाडीत सगळे एकत्र असल्याने थोडी अडचण होते. पण, सगळे सांभाळून घेऊन वाटचाल करत आहोत. सध्या माझ्याकडील जबाबदाऱ्यांचा व्याप वाढल्याने सगळीकडे थोडे थोडे लक्ष द्यावे लागत आहे. त्यामुळे कोरेगावकडे दुर्लक्ष होतेय असे नाही.’’

Shashikant Shinde
भाजप आमदाराच्या रुग्णालयाची होणार झाडाझडती; उलट-सुलट चर्चांना उधाण

जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गासह रस्त्यांचीही दुरवस्था झाली आहे, याकडे आमदार शिंदेंचे लक्ष वेधले असता ते म्हणाले,‘‘ महामार्गाच्या कामात प्रचंड त्रुटी राहिलेल्या आहेत. त्यामुळे साताऱ्याला टोल लागू नये, अशी सर्वांची मागणी आहे. यासाठी सर्वपक्षीय आंदोलन झाले, तर त्यामध्ये आम्ही शंभर टक्के सहभागी होऊ. महामार्ग व टोलच्या प्रश्नाबाबत सातारकरांसाठी सर्वपक्षीय आंदोलन गरजेचे आहे. त्यासाठी सर्वांची एकजूट करून आंदोलन केले तर जनरेटा तयार होईल. पुणे-सातारा रस्त्याचे काम एका कंपनीने केलेले आहे. त्यामध्ये अनेक त्रुटी राहिलेल्या आहेत. त्यामुळे आजही लोकांना महामार्गावर जीव गमवावा लागत आहे. त्यामुळे महामार्ग व टोलमाफीसाठी आंदोलन झाले तर स्वतः पुढाकार घेऊन आंदोलनात उतरण्याची आमची तयारी आहे. या प्रश्नी आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी पुढाकार घेतलेला आहे. त्यांच्यासोबत मी आंदोलनात उतरण्यास तयार आहे.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()