चर्चा तर होणारच! जिल्हा बँकेचं राजकारण तापलं; BJP-NCP आमदार एकत्र?

जिल्हा बँकेच्या मैदानात जावळीच राजकारण चर्चेत
Shashikant Shinde
Shashikant Shindeesakal
Updated on

भिलार (सातारा) : निवडणूक जाहीर झाल्याने सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे (Satara Bank Election) राजकारण जिल्ह्यात तापू लागले आहे. राजपुरीत (ता. महाबळेश्‍वर) बँकेचे संचालक राजेंद्रशेठ राजपुरे यांच्या निवासस्थानी बँकेच्या विद्यमान अध्यक्षांसह अनेक संचालक व पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली. त्यात आगामी निवडणुकीच्या पाश्‍वर्भूमीवर व्यूहरचना तर केल्या नाहीत ना, अशी चर्चा जिल्ह्यात सुरू आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या भेटीच्या फोटोतून अनेक तर्कवितर्क राजकीय वर्तुळात वतर्वले जात आहेत.

Summary

निवडणूक जाहीर झाल्याने सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे राजकारण जिल्ह्यात तापू लागले आहे.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने ‘टार्गेट जावळी’ हे सत्र सुरू झाल्याचे दिसते. राजपुरीत (ता. १) झालेल्या भेटींतून हे स्पष्ट होते. सोसायटी मतदारसंघातून आमदार शशिकांत शिंदे (MLA Shashikant Shinde) यांनी आपली निवड पक्की करत आणली असतानाच त्यांना एका बाजूने ज्ञानदेव रांजणे आणि दुसऱ्या बाजूने कारखाना गटाचे सौरभ शिंदे यांनी आव्हान दिले आहे. त्यामुळे आमदार शिंदे यांना खिंडीत गाठून त्यांचा राजकीय गेम करण्याच्या हालचाली गतिमान झालेल्या दिसतात. दुसऱ्या बाजूने ‘प्रतापगड कारखाना’ (Pratapgad Factory) ही जावळीची आस्मिता टिकवण्यासाठी अनेक युक्त्या झाल्या; परंतु कोरेगाव आणि साताऱ्याच्या चढाओढीत वाईच्या ‘किसन वीर’ने संधी साधली. आता पुन्हा एकदा हा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. जावळी तालुक्याचे अर्थचक्र गतिमान व्हावे यासाठी प्रतापगडची उभारणी झाली. उसाचे क्षेत्रही तालुक्यात वाढू लागले; परंतु कारखान्याची होरपळ आणि तालुक्यातील सत्तासंघर्ष या अर्थचक्राच्या आड येऊ लागला. शह- काटशहाच्या राजकारणात ऊस उत्पादक वाऱ्यावर पडला आणि अनेक उत्पादकांनी आपला ऊस अक्षरशः डोळ्यादेखत स्वतःच्या शेतात पेटवून दिला. प्रतापगड कारखाना चांगल्या रीतीने चालला, तर येथील ऊस उत्पादक सैरभैर फिरणार नाही. त्यासाठी आता सर्वांच्या नजरा ‘प्रतापगड’ सर करण्याकडे लागल्या असल्याचे चित्र आहे.

Shashikant Shinde
जिल्हा बॅंकेच्या 1963 मतदारांची कच्ची यादी आज प्रसिध्द होणार

कालची राजपुरी भेट खासगी असली, तरी त्यातील मान्यवरांची उपस्थिती पाहता आगामी निवडणुकीचे चित्रच डोळ्यासमोर उभे राहिले आहे. त्यामुळे भविष्यातील बँकेच्या राजकारणाची बांधणी तर नाही ना अशा शंका कुशंका सध्या ऐकायला मिळत आहेत.बँक आणि प्रतापगड कारखाना मैदानातून आमदार शिंदेंचे वर्चस्व संपवण्यासाठी हालचाली चालू असल्याचे सध्या दिसत आहे. ऐनवेळी ज्ञानदेव रांजणे आणि सौरभ शिंदे यांच्या प्रवेशावरून अनेक प्रश्‍नांची उत्तरे मिळू लागली आहेत.

या भेटीबाबत खुद्द राजेंद्रशेठ राजपुरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ‘आम्ही सर्व जण एका कार्यक्रमानिमित्त महाबळेश्वर तालुक्यात आलो होतो. त्यामुळे ही केवळ सदिच्छा भेट होती’, असे सांगितले असले तरी सध्याचे निवडणुकीचे वारे आणि फोटोतील मान्यवरांची उपस्थिती सर्व काही सांगून जाते. जावळीच्या आस्मितेचे भवितव्य सध्या बँक निवडणुकीच्या चक्रात अडकून उजळायला हवं; अन्यथा राजकारण्यांचा सत्तासंघषार्यामध्ये तालुक्यातील ऊस उत्पादक रसातळाला जावून त्याचा ‘दूध संघ’ होवू नये, हीच अपेक्षा जावळीकरांच्यातून व्यक्त होत आहे.

Shashikant Shinde
मृगजळ बनून बाहेरून येणाऱ्यांच्या मागे धावू नका

चक्रव्यूहात वचर्स्व संपवण्याच्या हालचाली

आमदार शशिकांत शिंदे यांची राजकीय नौका सध्या चक्रव्यूहात दिसते. मुंबईच्या मैदानात माथाडी नेते नरेंद्र पाटील, कोरेगावच्या आखाड्यात आमदार महेश शिंदे, जावळीच्या रणांगणात कारखाना व आमदार गट, तर बँकेच्या सारीपाटावर अध्यक्षपदासाठी स्वतः इच्छुक असल्याने वेगळा गट आणि एकूणच जिल्ह्याच्या राजकारणात शिंदे विरुद्ध राष्ट्रवादीतील नाराज आणि दुसरीकडे भाजप अशा जबरदस्त विरोधामुळे शिंदे यांची राजकीय ताकद डळमळीत करण्याची व्यूहरचना बँकेच्या निमित्ताने सुरू असल्याचे दिसते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()