सातारा : सातारा पालिकेतर्फे (Satara Municipality) फेरीवाल्यांना प्रत्येकी एक हजार रुपये मदत देण्याची घोषणा खासदार उदयनराजे भोसले (MP Udayanraje Bhosale) यांनी केली होती. दीड महिना उलटूनही त्याची अंमलबजावणी होत नसल्याने आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी (MLA Shivendrasinghraje Bhosale) उदयनराजेंच्या घोषणेची सातारा पालिका अंमलबजावणी कधी करणार? का ही घोषणाही हवेत विरणार आहे, असा सवाल पत्रकाव्दारे उपस्थित केला आहे. (MLA Shivendrasinghraje Bhosale Criticizes MP Udayanraje Bhosale In Satara)
सातारा पालिकेतर्फे फेरीवाल्यांना प्रत्येकी एक हजार रुपये मदत देण्याची घोषणा खासदार उदयनराजे भोसले यांनी केली होती.
गेल्या लॉकडाउनमध्ये (Lockdown) फेरीवाल्याचे झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी त्यांना दिलासा देण्यासाठी सातारा पालिकेने प्रत्येक फेरीवाल्यास एक हजार रुपये देण्याची घोषणा केली होती. उदयनराजेंच्या या घोषणेचे त्यावेळी स्वागतही झाले होते. गत लॉकडाउनमध्ये झालेले नुकसान सोसत असतानाच पुन्हा एकदा लॉकडाउन सुरु झाले आहे. यामुळे हातावर पोट असणाऱ्या फेरीवाल्यांचे जगणे मुश्किल झाले आहे. एक हजार देण्याची घोषणा करुन दीड महिना उलटला तरी त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी पालिकेकडून झाली नसल्याने अनेकांची निराशा झाली आहे. अनेक जण पालिकेकडून देण्यात येणाऱ्या मदतीकडे नजरा लावून बसले आहेत.
उदयनराजेंनी केलेल्या घोषणेची पालिका अंमलबजावणी का करत नाही, असा सवाल करत शिवेंद्रसिंहराजेंनी मर्जीतल्या ठेकेदारांची बिले काढत कमिशन काढायची गडबड असल्यानेच फेरीवाल्यांना पैसे देण्यात येत नसल्याचा आरोपही पत्रकात केला आहे. गोरगरीब फेरीवाल्यांचा विचार करत त्यांना तत्काळ मदत देण्याची कार्यवाही पालिकेने करण्याची मागणीही शिवेंद्रसिंहराजेंनी पत्रकात केली आहे. याच पत्रकात त्यांनी अनलॉक प्रक्रियेनंतर व्यवसाय सुरु झाल्यानंतर सत्ताधारी नगरसेवक हप्ता गोळा करताना फेरीवाल्यांना दर महिना ठरलेल्या रक्कमेत एक हजाराची सुट तर देणार नाहीत, असा खोचक सवालही उपस्थित केला आहे.
MLA Shivendrasinghraje Bhosale Criticizes MP Udayanraje Bhosale In Satara
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.