पत्‍नीच्या पराभवाचा शिवेंद्रसिंहराजे उदयनराजेंचा बदला घेणार?

Udayanraje Bhosale
Udayanraje Bhosaleesakal
Updated on

सातारा : आगामी निवडणुकीत सातारा पालिकेची सत्ता हातात ठेवण्‍यासाठी खासदार उदयनराजे भोसले (MP Udayanraje Bhosale) सक्रिय झाले असून, त्‍यांनी शहरासह विस्‍तारित भागातील विकासकामांवर जोर दिलेला आहे. निवडणुकीतील गुलालासाठी उदयनराजे ‘ॲक्‍शन मोड’मध्‍ये आल्‍याने सातारा विकास आघाडीचे (Satara Vikas Aghadi) सर्व पदाधिकारी, नगरसेवक आणि समर्थक अंग झटकून कामाला लागले असून, येत्‍या काही दिवसांत आरोप-प्रत्‍यारोपांच्‍या फैरींमुळे साताऱ्यातील राजकीय वातावरण तापणार आहे.

Summary

आगामी निवडणुकीत सातारा पालिकेची सत्ता हातात ठेवण्‍यासाठी खासदार उदयनराजे भोसले सक्रिय झाले आहेत.

सातारा पालिकेची सत्ता गत निवडणुकीत (Satara Municipal Election) सातारा विकास आघाडीच्‍या माध्‍यमातून खासदार उदयनराजे भोसले यांनी एकहाती मिळवली. या निवडणुकीत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (MLA Shivendrasinharaje Bhosale) यांच्‍या पत्‍नी वेदांतिकाराजे भोसले (Vedantikaraje Bhosle) यांना पहिल्‍याच सार्वत्रिक निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले. वेदांतिकाराजे यांच्‍या पराभवाचा वचपा येत्‍या निवडणुकीत काढण्‍याचा प्रयत्‍न आमदार गटाकडून होणार असून, त्‍याची तयारी त्‍यांनी सुरू केली आहे. त्‍यांच्‍या हालचालींवर लक्ष ठेवत उदयनराजे यांनी शहरासह विस्‍तारित भागातील कामांवर प्राधान्‍याने लक्ष दिले आहे. शाहूपुरी परिसरात उदयनराजे गटाचे प्राबल्‍य असून, त्‍या ठिकाणच्‍या लोकसंख्‍येनुसार होणाऱ्या प्रभाग निर्मितीनंतर पाच नगरसेवक पालिकेत पोचणार आहेत. शहरासह विस्‍तारित भागातील बहुसंख्‍य नगरसेवक आपल्‍याच विचारांचे असावेत, यासाठीची धोरणे उदयनराजे यांनी ठरवत विकासकामांना चालना दिली आहे. सातारा शहरात काही प्रभागांत सातारा विकास आघाडी आपले विचार पोचविण्‍यात मागे पडत आहे. त्याकडे उदयनराजेंना लक्ष द्यावे लागणार आहे. सत्तेत असल्‍याने सातारा विकास आघाडीचा जास्‍तीचा प्रभाव सातारकरांवर असून, त्‍याच प्रभावाच्‍या आधारावर ते सत्ता काबीज करण्‍यासाठीच्‍या चाली आखल्या जात आहेत.

Udayanraje Bhosale
'सातारकर सोबत आहेत ना.. मग बस्स! मला आणखी कोणाची गरज नाही'

गतवेळी विस्‍तारित भागासह शहरातील सुमारे ३०० हून अधिक विकासकामांना मंजुरी दिली. यात विरोधी नगरसेवकांनी सुचविलेलीदेखील अनेक कामे असून, त्‍या आधारे आगामी काळातील विरोधी गटाकडून होणाऱ्या दुजाभावाच्‍या आरोपाची धार कमी करण्‍याचा प्रयत्‍न साविआने केला आहे. विकासकामांच्‍या माध्‍यमातून उदयनराजे यांनी निवडणुकीची मुहूर्तमेढ रोवत सत्तेची लगीनघाई सुरू केली आहे. साविआला टक्कर देत सत्ता मिळवण्‍यासाठी नगरविकास आघाडीदेखील सक्रिय झाली असून, आगामी काळात काही आव्‍हाने ते साविआसमोर उभी करण्‍याची शक्‍यता आहे. या आव्‍हानांवर उदयनराजे कशी मात करतात, यावर पालिकेच्‍या निवडणुकीचे चित्र अवलंबून राहणार आहे. परंतु, गेल्या काही दिवसांपासून शांत असलेले उदयनराजे सक्रिय झाले आहेत. त्यामुळे संपूर्ण सातारा विकास आघाडी ही ॲक्शन मोडमध्ये आली आहे.

Udayanraje Bhosale
एकतर्फी प्रेमातून भरदिवसा युवतीचा गळा चिरून खून

वन मॅन आर्मी

बेधडक वक्‍तव्‍य, कोणालाही अंगावर, शिंगावर घेण्‍याची वृत्ती, कृती आणि वन मॅन आर्मी धोरणामुळे सातारकरांना उदयनराजेंचे प्रचंड आकर्षण आहे. जसे आहेत तसे त्‍यांना मानणारा, स्‍वीकारणारा फार मोठा वर्ग साताऱ्यात आहे. सर्वसामान्‍यांविषयी असणारी कणव, प्रेम, लोकांना आकर्षित करण्‍याची पध्‍दत ही त्‍यांची बलस्‍थाने आहेत. परंतु, नेहमीप्रमाणे सत्तेविरोधातील रोषाचा सामनाही सत्ताधाऱ्यांना करावा लागतो. शहरात काही प्रमाणात असलेले हे वातावरण बदलण्याचे कामही उदयनराजेंना करावे लागणार आहे.

...अशी असतील आव्‍हाने

  • अंतर्गत बंडाळी मोडून काढणे

  • एकसंध साविआ पुढे आणणे

  • विखुरलेले समर्थक एकवटणे

  • गुन्‍हेगारी प्रवृत्तींना दूर लोटणे

  • लवचिक धोरणांचा अंगीकार

  • रोजगारनिर्मितीच्‍या धोरणाची आखणी करणे

  • सर्वसामान्‍यांच्‍या कामाला चालना देणे

  • होणाऱ्या आरोपांचे प्रभावी खंडन करणे

Udayanraje Bhosale
Banner War : साताऱ्यात श्रेयवादावरून दोन राजे आमने-सामने

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.