सातारा : जिल्हा बँकेत (Satara District Bank) पक्ष म्हणून कोणीही काम करत नाही. राजकीय विषय बाजूला ठेऊन सहकारी बँक म्हणून आम्ही सर्वजण एकत्र काम करतो. मी राष्ट्रवादीतून आमदार झाल्यानंतर बँकेचा अध्यक्ष झालेलो आहे. त्यानंतर मी भाजपमध्ये गेलो आहे. ईडीच्या (ED) विषयी तुम्ही राष्ट्रवादी (NCP) व भाजपच्या (BJP) प्रमुख नेत्यांना विचारा, मी अधिक काहीही सांगू शकत नाही, असे सांगत जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (MLA Shivendrasinharaje Bhosale) यांनी भाजप ईडीचा गैरवापर करतंय या राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या आरोपावर अधिक बोलणे टाळले. दरम्यान, बँकेला ईडीची नोटीस आलेली नाही. तर जरंडेश्वर कारखान्याला (Jarandeshwar Sugar Factory) बँकेने कर्जपुरवठा केलेल्याबद्दलची माहिती मागवली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. (MLA Shivendrasinharaje Bhosale Advice To Ask NCP And BJP Leaders About ED Satara Political News)
जिल्हा बँकेत पक्ष म्हणून कोणीही काम करत नाही. राजकीय विषय बाजूला ठेऊन सहकारी बँक म्हणून आम्ही सर्वजण एकत्र काम करतो.
जिल्हा बॅंकेला नाबार्डचा पुरस्कार (NABARD Award) मिळाल्याबद्दल माहिती देण्यासाठी बॅंकेत पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, सर्वाधिक चर्चा ईडीच्या नोटिसीचीच होती. यावेळी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी ईडीच्या नोटीसी विषयीची नेमकी माहिती दिली. ते म्हणाले, बँकेला ईडीची नोटीस आलेली नाही. तर जरंडेश्वर कारखान्याला बँकेने कर्जपुरवठा केलेल्याबद्दलची माहिती मागवली आहे. त्यामुळे बँकेविषयी ठेवीदार व खातेदारांनी गैरसमज करून घेऊ नये. बॅंकेला कोणताही धोका नाही. जरंडेश्वर कारखान्याला निकषात राहूनच कर्ज पुरवठा केलेला आहे. खासगी कारखाना म्हणून निकषात कुठेही डावलले नाही. बँकेने पाच सहकारी व दोन खासगी कारखान्यांना कर्जपुरवठा केलेला आहे. प्रचलित धोरणाप्रमाणे व रिझर्व्ह बँक आणि नाबार्डच्या निकषाप्रमाणे कारखान्यांना कर्ज दिलेले आहे.
यापुढेही कोणत्याही साखर कारखान्याने कर्ज मागितले, तर त्याला निकषात राहूनच कर्ज दिले जाईल. बँकेकडे जरंडेश्वर कारखान्याची ४७२ कोटींची मुल्यांकन असलेली मालमत्ता तसेच ३० कोटींची साखर तारण आहे. त्यापैकी साखरेवर दिलेल्या कर्जाची कारखान्याने १५ कोटींची परतफेड केलेली आहे. भाजप ईडीचा गैरवापर करतंय, असा आरोप राष्ट्रवादीचे आमदार शशीकांत शिंदे (MLA Shashikant Shinde) यांनी केला आहे, याविषयी विचारले असता आमदार शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, बँकेत पक्ष म्हणून कोणीही काम करत नाही. राजकिय विषय बाजूला ठेऊन सहकारी बँक म्हणून आम्ही सर्वजण एकत्र काम करतो. मी राष्ट्रवादीतून आमदार झाल्यानंतर बँकेचा अध्यक्ष झालेलो आहे. त्यानंतर मी भाजपमध्ये गेलेलो आहे. ईडीच्या विषयी तुम्ही राष्ट्रवादी व भाजपच्या प्रमुख नेत्यांना विचारा, मी अधिक काहीही सांगू शकत नाही, असे सांगून त्यांनी अधिक बोलणे टाळले. ईडीच्या चौकशीविषयी पत्रकार परिषदेत प्रश्न विचारले जातील, हे लक्षात घेऊन बँकेच्या आजच्या पुरस्कार मिळालेल्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख दिग्गज संचालक पत्रकार परिषदेस उपस्थित नव्हते.
MLA Shivendrasinharaje Bhosale Advice To Ask NCP And BJP Leaders About ED Satara Political News
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.