'आमदार शिंदेंना थंड करुन घरी बसवण्याची ताकत आमच्यात'

Shivendrasinharaje Bhosle
Shivendrasinharaje Bhosleesakal
Updated on
Summary

'भविष्यातील सर्व निवडणुका या आमच्या ताकदीवर लढणार आहे.'

सातारा : भविष्यातील सातारा-जावळी तालुक्यातील सर्व निवडणुका आम्ही आमच्या ताकदीवर लढणार आहे. त्यामुळं त्यांनी किती लक्ष घातलं किंवा ते कितीही गरम झाले, तरी त्यांना थंड करण्याची ताकत आमच्यात आहे, असा टोला आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendrasinharaje Bhosle) यांनी शशिकांत शिंदेंना (Shashikant Shinde) लगावला. जावळीतील पराभव (Satara District Bank Election) गटबाजीतून झाला असून त्याचे खापर माझ्यावर फोडण्यापेक्षा त्यांनी आत्मचिंतन करावं. तसेच बँकेचे अध्यक्षपद मिळणे किंवा न मिळण्याशी त्यांच्या शिफारशीचा काहीही संबंध नाही, केवळ सहानभूती मिळवण्यासाठी त्यांचा हा केविलवाणा प्रयत्न आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

माझी शिफारस कमी पडल्याने शिवेंद्रसिंहराजे जिल्हा बँकेचे अध्यक्ष होऊ शकले नाहीत. मागील वेळी मी शिफारस केल्यानेच त्यांना बँकेचे अध्यक्षपद मिळाले होते, असे आमदार शशिकांत शिंदे यांनी स्पष्ट केले होते. त्याला काल आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी प्रतिउत्तर देत आमदार शिंदेंचा मुद्दा खोडून काढला आहे. शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, मागील वेळी जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडीबाबत राष्ट्रवादी भवनात प्रमुख नेत्यांची बैठक झाली होती. त्यावेळी मी सर्वांना मला पाच वर्षे अध्यक्षपद देणार असाल तरच मी बँकेचा अध्यक्ष होण्यास तयार आहे, अशी मी भूमिका मांडली होती. त्यावेळी पाच वर्षे अध्यक्षपद देण्यास आमदार शशिकांत शिंदे यांनी हरकत घेतली होती. पण, मागील वेळी मला सहा वर्षे अध्यक्ष पद मिळाले. यावेळेस जिल्ह्यातील नेत्यांसह बँकेचे अधिकारी व कर्मचारी यांनी पुन्हा तुम्ही अध्यक्ष व्हावे, अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यांच्या मागणीनुसार मी श्री. पवार साहेब यांना भेटून दुसऱ्यांदा संधी देण्याची मागणी केली होती. पण, त्यांनी नितीन पाटील यांच्या नावाला मान्यता दिली. माझा नितीन पाटील यांना कोणताही विरोध नव्हता. उलट मी त्यांच्या नावाला एका मिनिटात सूचक होण्यास तयार झालो. आम्ही खूप चांगले मित्र असून त्यांना माझे कायम सहकार्य राहणार आहे.

Shivendrasinharaje Bhosle
'अध्यक्षपदासाठी शिवेंद्रराजेंच्या नावाची मीच शिफारस केली होती; पण..'

त्यामुळं आमदार शिंदेंच्या शिफारशीमुळे मला मागील वेळी अध्यक्षपद मिळालेले नव्हते आणि यावेळेसही त्यांच्या शिफारशी अभावी मिळाले नाही. जावळीतील पराभव हा गटबाजीच्या राजकारणातून झाला आहे, त्यांचेच ठराव असूनही लोक त्यांच्यासोबत का राहिले नाहीत याचे त्यांनी आत्मचिंतन करावे, असा सल्ला त्यांनी दिला. शिंदेंनी त्यांच्या आमदारकीत भाऊसाहेब महाराजांचे मोठे योगदान असल्याचे सांगत आहेत. पण, त्यांनी भाऊसाहेब महाराजांच्या पडत्या काळात किती मदत केली, त्यांना मंत्रीपदासाठी डावलले होते त्यावेळी तुम्ही किती शिफारशी केल्या होत्या, याचे उत्तर द्या. केवळ सातारा तालुक्यात सहानुभूती मिळविण्यासाठीच त्यांचा हा प्रयत्न आहे. बँकेत काही फॉर्म्युला ठरला आहे का, यावर शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडीवेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे यांनी नावे जाहीर करताना अध्यक्ष व उपाध्यक्ष ही दोन्ही पदे एक वर्षासाठी असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे प्रत्येक वर्षी एकाला संचालकाला संधी मिळणार आहे.

Shivendrasinharaje Bhosle
'ठरलं होतं, तसंच झालं'; आमदार शिवेंद्रसिंहराजेंचं अध्यक्षपद हुकलं, पण..

जावळीत पक्ष वाढीची जबाबदारी पार पाडत होतो, असे आमदार शिंदेंनी सांगितले आहे. याविषयी विचारले असता, शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, तुम्ही जावळीत पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडत होता. तर सौरभ शिंदेंचा पराभव का झाला, प्रवीण देशमाने यांचा पराभव का झाला, याचे उत्तर द्यावे. सभापती अरूणा शिर्के यांच्या विरोधात तक्रारी करण्या मागे कोण होते याचे उत्तर शिंदेंनी द्यावे. पक्ष वाढवण्यासाठी जावलीच का, असा प्रश्न करून माण, खटाव किंवा पाटणमध्ये पक्ष वाढविण्यास जावे, त्यांचे जावलीत का लक्ष आहे हे आमच्या लक्षात आले असून मुलाचे पाय पाळण्यात दिसतात.. हे न समजण्याइतका मी नाही. आगामी निवडणुकांत तुम्ही भूमिका काय असेल, यावर शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, भविष्यातील सर्व निवडणुका या आमच्या ताकदीवर लढणार आहे. त्यामुळे त्यांनी किती लक्ष घातले किंवा ते कितीही गरम झाले तरी त्यांना थंड करण्याची ताकत आमच्यात आहे, असेही त्यांनी सांगितले. जावळीतील ऊस नेण्यातही राजकारण केले जात असल्याचा आरोप शशिकांत शिंदे यांनी केला होता. त्यावर शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, आम्ही ऊस नेणार नाही असे म्हटलेले नव्हते. उलट शशिकांत शिंदे यांना जरंडेश्वरच्या टोळ्या मिळाल्या नाहीत, यात माझा काय दोष, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

Shivendrasinharaje Bhosle
काँग्रेसला 'अच्छे दिन'; पक्ष सोडून गेलेले माजी आमदार स्वगृही परतले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()