उदयनराजेंनी चवताळून, चिडून कुजक्यासारखे माझ्यावर आरोप केलेत : शिवेंद्रसिंहराजे

खासदार उदयनराजेंनी केलेल्या आरोपाला शिवेंद्रसिंहराजेंनी पत्रकार परिषदेतून प्रत्युत्तर दिलंय.
Udayanraje Bhosale vs Shivendraraje Bhosale
Udayanraje Bhosale vs Shivendraraje Bhosaleesakal
Updated on
Summary

खासदार उदयनराजेंनी केलेल्या आरोपाला शिवेंद्रसिंहराजेंनी पत्रकार परिषदेतून प्रत्युत्तर दिलंय.

सातारा : मुंबई दौरा मनासारखा न झाल्याने उदयनराजेंनी (Udayanraje Bhosale) चवताळून, चिडून माझ्यावर आरोप केले आहेत. नेहमीप्रमाणे कुजकेपणा त्यांच्या बोलण्यात नव्हता. कमिशनबाजीमुळे त्यांची सातारा विकास आघाडी धोक्यात आल्याने या नैराश्यातून ते बिनबुडाचे आरोप करत आहेत. निवडणुकीत ५० नगरसेवक निवडून आणण्याची त्यांना गॅरंटी आहे तर घाबरायचं का. यावेळेस खासदारांच्या आघाडीचा सातारकर १०० टक्के कडेलोट करतील, अशी टीका आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendrasinghraje Bhosale) यांनी केली आहे.

खासदार उदयनराजे भोसले यांनी केलेल्या आरोपाला शिवेंद्रसिंहराजेंनी पत्रकार परिषदेतून प्रत्युत्तर दिले. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ‘‘मला अलगद आमदारकी मिळालेली नाही, तर तुम्हाला पाडून दहा हजारांच्या मताधिक्याने निवडून येत ती मिळवली आहे. त्यामुळे त्यांचे वक्तव्य बालिशपणाचे आहे. पालिकेच्या निवडणुकीत ते दोन वॉर्डमधून लढले; पण एकातून पराभूत झाले. ते जर युगपुरुष आहेत तर का पराभूत झाले? पालिका, आमदारकी, खासदारकी ते पराभूत झाले आहेत. मी मताधिक्याने निवडून आलेलो आहे, हे त्यांनी विसरू नये.’’ मुंबईच्या दौऱ्यात त्यांच्या मनासारखं झालं नाही म्हणून ते तेथून आल्यावर माझ्यावर चवताळून, चिडून बोलले, एरवीही ते कुजक्यासारखे बोलतात. पालिकेच्या नवीन इमारतीसाठी ७० कोटी घालविण्याचे नेमके कारण त्यांनी सांगावे. जुन्या इमारतीत त्यांनी काय दिवे लावले म्हणून नवीन इमारत बांधत आहेत, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

Udayanraje Bhosale vs Shivendraraje Bhosale
मोठी दुर्घटना! हरियाणात गणपती विसर्जनावेळी 7 जणांचा बुडून मृत्यू, 4 जणांना वाचवण्यात यश

सातारा पालिकेच्या (Satara Municipal Election) जुन्या इमारतीच्या जागेवर (कै.) भाऊसाहेब महाराजांनी टाऊन हॉलच्या आरक्षणाची भूमिका मांडली होती. मात्र ते सुद्धा काम यांनी होऊ दिले नाही. जो कमी पैशात काम करत होता, त्या एजन्सीला काम न देता, ज्याला काम दिले तो नाशिकचा कंत्राटदार. त्याची निविदा ही सेकंड हायेस्ट होती. मग नाशिकच्या कंत्राटदारावर यांचे प्रेम कशासाठी. आज माझा कडेलोट करा म्हणताय मग त्या वेळचे संभाषण ऐका कायगुडे, धुमाळ, यादव यांच्या भ्रष्ट कारभारानेच सातारा विकास आघाडीचा कडेलोट झाला आहे. हा विषयच नाही यांचे आरोप हे राजकीय नैराश्यातून सुरू झाले आहेत. येत्या पालिकेच्या निवडणुकीमध्ये सातारा विकास आघाडीचा निश्चितच कडेलोट होणार आहे, असे स्पष्ट करून शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ‘‘२० वर्षे जंतूनाशक पावडरचे टेंडर सोलापूरला का दिले जाते, असा प्रश्न करून तेथील पावडर इतकी चांगली आहे, की साताऱ्यातील रोगराई पळून जाईल. स्वच्छता अभियानात पालिकेला मिळालेला पुरस्कार हा प्रशासकांमुळे मिळाला आहे. त्याचे श्रेय त्यांनी घेऊ नये. सातारा विकास आघाडीने या पुरस्कारासाठी काहीही केलेले नाही. केवळ बोगसपणा केला आहे.’’

Udayanraje Bhosale vs Shivendraraje Bhosale
Ganesh Visarjan : जळगावात गणपती विसर्जनावेळी महापौरांच्या घरावर हल्ला

कास धरणासाठी एक तरी बैठक घेतल्याचे दाखवावे. पैशाअभावी प्रकल्प रखडला. त्यावेळी तुम्ही दादांकडे निवेदन देण्यासाठी गेला होता. शाहूपुरीचे सरपंच संजय पाटलांचे सरपंचपद वाचविण्यासाठी रवी साळुंखेंनी पालिकेच्या हद्दवाढीचा जिल्हा परिषदेत ठराव केला नाही. ‘कोण दादा...’ ते म्हणतात, मग अजितदादांना निवेदन देतानाचा उदयनराजेंचा फोटो दाखवत, हे कशासाठी दादांकडे गेले होते, असाही त्यांनी प्रश्न केला. प्रत्येकवेळी समोरासमोर म्हणतात आणि जागा बदलता, असे सांगून ते म्हणाले, ‘‘जम्बो कोविड रुग्णालय संग्रहालयात केल्यामुळे हजारो लोकांचे कोविडमध्ये प्राण वाचले. त्यावेळी सातारा पालिकेने काहीही केले नाही. राजपथावरील दीपमाळेचा प्रकाश कारंज्यांत पडला आहे. त्यांच्या कारभारामुळे आगामी निवडणुकीत सातारकर सातारा विकास आघाडीचा कडेलोट करतील. त्यांच्या आघाडीचा पालिकेतून कडेलोट होईल. त्यांना घरी बसण्याची वेळ आली आहे.’’ अशोक मोने निवडून आले तर मी मिशा व भुवया काढीन, असे म्हणणाऱ्या उदयनराजेंनी मिशा व भुवया का काढल्या नाहीत, असा प्रश्न शिवेंद्रसिंहराजेंनी उपस्थित केला.

Udayanraje Bhosale vs Shivendraraje Bhosale
Lalbaug Raja Ganesh Visarjan : पुढच्या वर्षी लवकर या! अलोट गर्दीत लाडक्या लालबागच्या राजाला निरोप

हा तर त्यांचा दुटप्पीपणा...

साताऱ्यातील राजवाडा ही आमची खासगी मालमत्ता आहे. तो परत मिळावा, अशी मागणी उदयनराजे व त्यांची आई राजमाता कल्पनाराजे भोसले यांनी शासनाकडे केली आहे. हा त्यांचा दुटप्पीपणा नाही का, असा टोलाही शिवेंद्रसिंहराजेंनी लगावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.