महाराष्ट्राच्या मोहितची छत्तीसगडात सुवर्ण कामगिरी

महाराष्ट्राच्या मोहितची छत्तीसगडात सुवर्ण कामगिरी
Updated on

कोरेगाव (जि. सातारा) : भारतीय ऍथलेटिक्‍स असोसिएशनच्या वतीने रायपूर (छत्तीसगड) येथे झालेल्या 32 व्या वेस्ट झोन कनिष्ठ गट मैदानी स्पर्धेत महाराष्ट्र संघातील खेळाडू व निगडी (ता. कोरेगाव) येथील निजानंद रंगनाथ स्वामी विद्यालयाचा अवघ्या 14 वर्षे वयाचा विद्यार्थी मोहित संतोष जगताप याने दोन हजार मीटर धावण्याच्या स्पर्धेत 6.4 मिनिटांची विक्रमी वेळ नोंदवत सुवर्णपदक पटकावले आहे. मोहितने आतापर्यंत दोन राष्ट्रीय, 12 राज्यस्तरीय स्पर्धांत चमकदार कामगिरी केली आहे.

शहरी सुविधांचा अभाव असतानाही मोहितने जिद्द व चिकाटीच्या जोरावर येथील डी. पी. भोसले महाविद्यालयाच्या मैदानावर दररोज सराव करून हे यश संपादन केले आहे. सर्वसामान्य कुटुंबातील मोहितने शहरी मुलांपेक्षाही सरस कामगिरी करत 6.4 मिनिटांमध्ये दोन हजार मीटर धावण्याच्या स्पर्धेत राष्ट्रीय पातळीवर मिळवलेल्या सुवर्णपदकाने महाराष्ट्राच्या संघाला सांघिक विजेतेपद मिळवून दिले आहे. छत्तीसगड येथील स्पर्धेनंतर आता पुढील महिन्यात तिरुपती येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेची तयारी मोहितने सुरू केली आहे. छत्तीसगडमध्ये मिळवलेल्या घवघवीत यशानंतर महाराष्ट्राचा उदयोन्मुख धावपटू म्हणून मोहित पुढे येत आहे. कोरेगावच्या सोनेरी ग्रुपच्या वतीने मोहित खेळतो, अशी माहिती या ग्रुपचे अध्यक्ष संतोष नलावडे यांनी दिली. 

सुशील कुमारनं मारलं मैदान; महाराष्ट्राच्या शिरपेचात महासचिवपद

देशपातळीवर यश मिळवण्याच्या जिद्दीने तो धावत असून, त्याला गरज आहे समाजाच्या मोठ्या पाठबळाची. असे पाठबळ मिळाल्यास तो निश्‍चित आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी करेल, असा विश्वास मोहितचे प्रशिक्षक आक्रम मुजावर व श्री. नलावडे यांनी व्यक्त केला आहे. 


""सन 2027 मध्ये होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेत खेळण्याचे स्वप्न उराशी बाळगून मोहितचा सराव सुरू आहे. त्याचा सराव मातीच्या मैदानावर होत असतो आणि स्पर्धा मात्र सिंथेटिक मैदानावर होतात. त्यामुळे बऱ्याच अडचणी आहेत. सरावासाठी अपुरी साधने आणि दररोजचा आहार व अनुषंगिक खर्चाचा मेळ घालणे अवघड आहे. तरीही दानशूरांच्या सहकार्याने मोहित प्रत्येक टप्प्यावर सरस कामगिरी करून दाखवत आहे.'' 

संतोष जगताप, मोहितचे वडील 

Edited By : Siddharth Latkar

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()