'टाळी एका हातांनी वाजत नाही, त्यासाठी दोन्ही हातांची गरज'; 'कृष्णा'त मनोमिलन शक्य?

Krishna Factory
Krishna Factoryesakal
Updated on

कऱ्हाड (सातारा) : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्यात (Krishna Sugar Factory) मनोमिलनाची चर्चा सुरू आहे. मात्र, काळ इतका पुढे निघुन गेलाय, की अर्ज भरण्याची वेळ निघून जावू नये, म्हणून आम्ही अर्ज भरले आहेत. मनोमिलनावर विसंबुन न राहता स्वबळाचीही तयारी केली आहे. त्यामुळे पूर्ण 21 लोकांची पॅनेल लढविण्याची तयारी आहे, असे स्पष्ट मत रयत संघर्ष मंचचे नेते व कृष्णाचे माजी अध्यक्ष डॉ. इंद्रजीत मोहिते (Dr. Indrajit Mohite) यांनी व्यक्ते केले. रयत संघर्ष मंचातर्फे आज येथे अर्ज दाखल केले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. (Mohite Group Prepares For Krishna Sugar Factory Election Satara Political News)

Summary

कृष्णा सहकारी साखर कारखान्यात संस्थापक पॅनेल आणि यशवंतराव मोहिते रयत संघर्ष पॅनेल एकत्रित येण्यासाठी आशावादी आहे.

डॉ. मोहिते म्हणाले, कृष्णा सहकारी साखर कारखान्यात संस्थापक पॅनेल आणि यशवंतराव मोहिते रयत संघर्ष पॅनेल एकत्रित येण्यासाठी आशावादी आहोत. संपूर्ण 21 लोकांचे पॅनेल लढवणार आहोत. आम्ही नेत्यांच्या आग्रहाचा विचार न करता सभासद आणि कारखाना हित लक्षात घेवून मनोमिलनाच्या चर्चेत उतरलो आहोत. त्याच मुद्द्यांवर आम्ही ठाम आहोत. कारखान्याचे हित बघणारे लोक आमच्या सोबत आहेत. ते सोबत राहतील, कारखान्याच्या हिताच्या आडवे येतील त्यांना विरोध करून आम्ही पुढे जाणार आहोत. कारखान्याचे हित बघणारी तरूण पिढीही आमच्या सोबत आहे. एका विचाराचे लोक एकत्रित आणत आहोत. एकमेकांच्या विरोधात लढलोय, त्यामुळे एकत्र येण्यास बराच वेळ लागणार आहे.

त्यामुळे मनोमिलनाचा विषय बाजूला ठेवला असे नाही. ती चर्चा चालूच राहिल, आम्ही सकारत्मक आहोत. परंतु, शेवट काय निष्पन्न होईल ते सांगता येणार नाही. सर्वांना विश्वासात घेवून एकत्रीकरणाच्या बैठका करत आहोत. त्याबाबत आशावादी आहोत. मात्र, टाळी एका हातांनी वाजत नाही तर त्यासाठी दोन्ही हातांची गरज असते. कारखाना अधिक लोकाभिमुख करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. मागील सत्ताधाऱ्यांनी जी उणिव ठेवली आहे, ती भरून काढायची आहे. त्यासाठी आम्ही सर्वांना एकत्रित करून एकसंध राहण्याचा प्रयत्न करत आहोत. परंतु, तो प्रयत्न अद्यापही पूर्णत्वास गेलेला नाही. तोपर्यंत अर्ज भरण्याचा अवधी संपेल म्हणून सर्व अर्ज भरले आहेत.

Mohite Group Prepares For Krishna Sugar Factory Election Satara Political News

Krishna Factory
'कृष्णा'त माेहित्यांच्या मनाेमिलनावर चर्चेचे गु-हाळ सुरुच

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.