माणमध्ये प्रभारी गटशिक्षणाधिकारी नको; पंचायत समितीच्या मासिक सभेत ठराव

Education News
Education Newsesakal
Updated on

दहिवडी (सातारा) : शिक्षण विभाग (Department of Education) अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळे आम्हाला अतिरिक्त कार्यभार असलेले प्रभारी गटशिक्षणाधिकारी नको, तर कायमस्वरूपी गटशिक्षणाधिकारी हवेत, या मागणीचा ठराव माण पंचायत समितीच्या Maan Panchayat Committee मासिक सभेत करण्यात आला. आज सभापती लतिका वीरकर (Speaker Latika Virkar) यांच्या अध्यक्षतेखालील पहिलीच ऑफलाइन मासिक सभा (Offline Monthly Meeting) झाली. या सभेस उपसभापती तानाजी कट्टे, गटविकास अधिकारी सर्जेराव पाटील, पंचायत समिती सदस्य कविता जगदाळे, नितीन राजगे, तानाजी काटकर, रंजना जगदाळे, अपर्णा भोसले, चंद्राबाई आटपाडकर व सहायक गटविकास अधिकारी भरत चौगुले (Group Development Officer Bharat Chougule) आदी उपस्थित होते. (Monthly Meeting Of Panchayat Samiti At Dahiwadi Satara Education News)

Summary

आज दहिवडीत सभापती लतिका वीरकर यांच्या अध्यक्षतेखालील पहिलीच ऑफलाइन मासिक सभा झाली.

माण गटशिक्षणाधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार घेतलेले लक्ष्मण पिसे यांनी आपली ओळख व आढावा देत असताना तानाजी काटकर यांनी तुमच्याकडे पूर्णवेळ पदभार आहे का? अशी विचारणा केली. त्या वेळी श्री. पिसे यांनी मी पंचायत समिती खटाव येथे विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत असून, माझ्याकडे माण गटशिक्षणाधिकारीपदाचा अतिरिक्त कार्यभार आहे, असे सांगितले. यावर आम्हाला अतिरिक्त कार्यभार असलेले प्रभारी गटशिक्षणाधिकारी नकोत. अतिरिक्त कार्यभार माणमधील विस्तार अधिकाऱ्यांना न देता खटावमधील विस्तार अधिकाऱ्यांना कसा दिला? असा प्रश्न तानाजी कट्टे व नितीन राजगे यांनी उपस्थित केला.

Education News
शिक्षण विभागाचा साता-यातील शाळेस झटका; मान्यता केली रद्द

अपर्णा भोसले यांनी श्री. पिसे यांचे काम चांगले असल्याचे मत मांडले. पूर्णवेळ कार्यभार सांभाळणारे गटशिक्षणाधिकारी माणला द्यावेत, असा ठराव या वेळी घेण्यात आला. या वेळी श्री. पिसे यांनी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मुख्याध्यापकांच्या २६ पदांपैकी फक्त ६ जण, तर केंद्रप्रमुखांच्या १९ पदांपैकी फक्त चार जण कार्यरत असल्याची माहिती दिली. नितीन राजगे यांनी पिंपरी येथे ग्रामपंचायत हद्दीत वृक्षतोड करण्यात आली आहे. त्याची जबाबदारी कोणाची? असा प्रश्न उपस्थित केला. याबाबत संबंधित विभाग चालढकल करत असल्याचा आरोप त्यांनी केला. एकात्मिक बालविकास प्रकल्प अंतर्गत होणाऱ्या कार्यक्रमांना संबंधित कर्मचारी यांच्याकडून पदाधिकाऱ्यांना बोलविले जात नसल्याचे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.

Education News
निवडणुकीतील घोषणा हवेत! राजकीय हेवेदाव्यांत नेत्यांचं विकासाकडं दुर्लक्ष

मी भागात फिरत असताना राणंद येथील कदम वस्ती, मार्डी येथील माळी वस्ती व शाळा नंबर दोन येथील शिक्षक उपस्थित नव्हते. त्यामुळे त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याची सूचना गटशिक्षणाधिकारी यांना केली आहे.

-सर्जेराव पाटील, गटविकास अधिकारी, पंचायत समिती माण

Monthly Meeting Of Panchayat Samiti At Dahiwadi Satara Education News

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()