वडूज (जि. सातारा) : खटाव पंचायत समितीच्या सदस्यांना 15 व्या वित्त आयोगातून आगामी काळात प्रत्येकी दहा लाख रुपयांचा विकासनिधी मिळणार असल्याची माहिती गटविकास अधिकारी रमेश काळे यांनी मासिक सभेत दिली.
प्रभारी सभापती कल्पना खाडे सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. या वेळी सदस्य धनंजय चव्हाण, संतोष साळुंखे, आनंदराव भोंडवे, कल्पना मोरे, नीलादेवी जाधव, जयश्री कदम-पाटील यांची उपस्थिती होती. या वेळी श्री. काळे यांनी सांगितले, की मतदारसंघातील विकासकामे करण्यासाठी सदस्यांना पंधराव्या वित्त आयोगातून मोठ्या प्रमाणावर निधी मिळणार आहे. हा निधी कशा पद्धतीने खर्च केला जाणार आहे, यासंबंधात माहिती देण्यासाठी सोमवारी (ता. 14) कार्यशाळा होणार आहे. या कार्यशाळेस जिल्हा परिषदेचे मान्यवर अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. शिक्षण विभागाच्या आढाव्यात पाचवी व आठवी शिष्यवृत्तीसाठी जिल्हा परिषदेतील विद्यार्थ्यांना सक्ती करण्याऐवजी गुणात्मक पारख करून ज्या विद्यार्थ्यांची क्षमता असेल, तेवढ्याच विद्यार्थ्यांना परीक्षेस बसवावे, तसेच क्षमता नसणाऱ्या विद्यार्थ्यांवर जबरदस्ती झाल्यास त्याच्या मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात, असे मत संतोष साळुंखे यांनी व्यक्त केले. दोन वर्षांचे तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण न झाल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. बांधकाम विभागाच्या आढाव्यात म्हासुर्णे येथील गटाराचे काम अपूर्ण असल्याचा मुद्दा जयश्री कदम यांनी उपस्थित केला.
आरोग्य विभागाच्या आढाव्यात तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. युन्नुस शेख यांनी कोरोना सद्यःस्थिती व इतर कामांची माहिती दिली. लघुपाटबंधारे विभागाच्या आढाव्यात सहायक अभियंता खांडेकर यांनी जिल्हा नियोजन समितीतून मंजूर झालेल्या व पूर्ण झालेल्या कामांची झाल्याची माहिती दिली. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या आढाव्यात अभियंता एस. के. झेंडे यांनी राष्ट्रीय पेयजल, मुख्यमंत्री पेयजल, क वर्ग यात्रास्थळ विकास कार्यक्रम व टंचाईमधून झालेल्या कामांची माहिती दिली. पशुसंवर्धन विभागाच्या आढाव्यात डॉ. माळवदे यांनी विविध योजना व पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या सद्यःस्थितीची माहिती दिली.
सदस्यांची नाराजी
भूमी अभिलेख विभागाच्या आढाव्यात मोजणीची प्रकरणे वेळेत निकालात निघत नसल्याबद्दल सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. मात्र, सक्षम अधिकारी हजर नसल्याने सदस्यांचे समाधान होऊ शकले नाही.
संपादन : बाळकृष्ण मधाळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.