अपघातानंतर संतप्त ग्रामस्थांनी काही काळ वाहतूक रोखून धरल्याने महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
वहागाव : पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील (Pune-Bangalore National Highway) कोर्टी (ता. कऱ्हाड) गावच्या हद्दीत हायड्रा क्रेनने तीन वाहनांना दिलेल्या धडकेत (Highway Accident) दुचाकीवरील माय-लेक ठार झाली, तर एक मुलगी गंभीर जखमी झाली आहे. रुक्मिणी संतोष परदेशी (वय ३६) व आर्या संतोष परदेशी (वय १२, दोघी रा. सोमवार पेठ, कऱ्हाड) असे मृत महिलांची नावे असून, गायत्री संतोष परदेशी (वय १८) ही गंभीर जखमी असून, उपचारासाठी कऱ्हाडच्या रुग्णालयात (Karad Hospital) दाखल केले आहे.