Satara: निमित्त कुस्तीचे अन् भाजपच्या वस्तादांची धुसफूस उघड, खासदार निंबाळकर विरुद्ध मोहिते पाटील शीतयुद्ध

खासदार निंबाळकर, मोहिते- पाटलांमधील मतभेद उघड
Satara
Sataraesakal
Updated on

सोलापूर: माढा लोकसभा मतदारसंघात राजकारणाला धार आली आहे. खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर आणि स्थानिक आमदार राम सातपुते यांना ताराराणी महिला केसरी कुस्ती स्पर्धेला निमंत्रण देण्यात आले नाही.

माध्यमांमध्ये याची चर्चा सुरू झाल्यानंतर रविवारच्या कार्यक्रमाला आमदार राम सातपुते यांना निमंत्रण देण्यात आले. मात्र, हा विषय केवळ आजच्या कार्यक्रमापुरता नाही. खासदार-आमदार व मोहिते-पाटील यांच्यातील शीतयुद्ध गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे.

मतदारसंघातील काही कार्यक्रम खासदार, आमदार परस्पर घेतात. त्या कार्यक्रमांना मोहिते-पाटील परिवारातील कुणालाही बोलविण्यात येत नाही. निधी वाटपातदेखील मोहिते-पाटील यांना विश्‍वासात घेतले जात नाही, असा आरोप मोहिते-पाटील यांच्या वतीने करण्यात येतो. अर्थात हे बोलण्यासाठी मोहिते-पाटलांकडून अधिकृतपणे कुणीही पुढे येत नाही. त्यांच्या वतीने त्यांचे काही निकटवर्तीय ही भूमिका मांडत आहेत.

Satara
Nagpur: हृदयद्रावक! खेळताना १५ वर्षीय गतिमंद मुलाचा गळफास लागून मृत्यू

खासदार-आमदारांना उद्‍घाटन कार्यक्रमाला न बोलविता फलटणचे संजीवराजे नाईक-निंबाळकर यांना निमंत्रण देणे. त्याच कार्यक्रमाला रामराजे निंबाळकरांनी उपस्थित राहणे, यातून खासदार निंबाळकरांना इशारा देण्यात येत असल्याचे मतदारसंघात बोलले जात आहे. लोकसभा निवडणूक वर्षभरावर येऊन ठेपली आहे.

२०२४ चा माढा लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार कोण असेल यावर चर्चा सुरू असताना हे शीतयुद्ध भाजपला महागात पडू शकते. माढा मतदारसंघात राष्ट्रवादी एका चांगल्या उमेदवाराच्या शोधात आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपतील शीतयुद्ध पक्षाला अडचणीत आणू शकते.

आता माढा लोकसभा मतदारसंघांचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर आणि मोहिते-पाटील परिवारात दरी वाढताना दिसत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला सुप्त संघर्ष चव्हाट्यावर आल्याची चर्चा आहे.

Satara
Crime News: गर्लफ्रेंड सोबत फिरणाऱ्या रिक्षाचालकावर मुलीच्या जुन्या मित्राचा चाकू हल्ला

मोहिते-पाटील आणि त्यांनीच निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीमधील मतभेद टोकाला गेल्याची चर्चा मतदारसंघात सुरू आहे. संजीवराजे निंबाळकर यांचे नाव माढा लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार म्हणून घेतले जाते. त्यामुळे मोहिते-पाटील यांच्या मनात नक्की काय चालले आहे, याबाबत राजकीय वर्तुळात अनेक चर्चा सुरू असतात.

त्यामुळे माढ्यामध्ये भाकरी फिरवणार का? अशी चर्चा होत आहे. मोहिते-पाटलांचा बालेकिल्ला असणारा माढा लोकसभा मतदारसंघ विजयसिंह मोहिते-पाटील खासदार असताना रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना सोडण्यात आला. रणजितसिंह नाईक-निंबाळकर मोठ्या मताधिक्याने निवडून आले. या विजयामध्ये मोहिते-पाटील परिवाराचा मोठा वाटा असल्याचे सांगितले जाते.

मिळेना तोलामोलाचे पद

भाजपमध्ये आल्यापासून मोहिते-पाटलांना त्यांच्या तोलामोलाचे पद मिळाले नाही. शिवाय अनेक कार्यक्रमांचे उद्‍घाटन खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांनी मोहिते-पाटीलांशिवाय केल्याचा आरोप होतो. त्यातच रणजितसिंह मोहिते-पाटील यांना माढा लोकसभा मतदारसंघात उमेदवारी मिळावी,

अशी मागणी सोशल मीडियावर कार्यकर्ते करताना दिसतात. त्यामुळे मोहिते-पाटलांच्या मनात नक्की काय चालले आहे. मोहिते-पाटलांचे हे धक्कातंत्र कोणाच्या पथ्यावर पडणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.